शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जंगली जनावरांनी केले पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: May 7, 2017 00:33 IST

मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शिवापूर चक येथे सर्व्हे नं. २४४ मध्ये जंगलाला लागून किरण विठ्ठलराव पोरेड्डीवार यांचे धानपीक शेवटच्या टप्प्यात म्हणजे .....

धान पीक नष्ट : वन विभागाकडे नुकसानभरपाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शिवापूर चक येथे सर्व्हे नं. २४४ मध्ये जंगलाला लागून किरण विठ्ठलराव पोरेड्डीवार यांचे धानपीक शेवटच्या टप्प्यात म्हणजे जवळपास धानाचा निसवापूर्ण होत असताना शेती भोवती पूर्ण कुंपण केले असतानासुद्धा अचानक रात्री जंगली रान म्हशींनी पिकावर हल्ला चढविला आणि एका रात्रीतून पूर्ण धानपीक फस्त केले. पोरेड्डीवार यांच्या मालकीचे २.९ हे.आर. शेत असून त्यापैकी १.२० हे. आर. जागेमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मोठ्या कष्टाने सिंचनाची सोय करून आपल्याला शेतीमधून फायदा होईल या दृष्टिकोनातून शेतात विहीर बांधली. विहिरीला पाणी भरपूर असल्याने त्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. दुसऱ्या दिवशी त्यांना शेतात फक्त धानाचे खुतवे दृष्टीस पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची आतापर्यंत केलेली मेहनत व खर्च केलेला पैसा पूर्णत: वाया गेला. त्यांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.एकीकडे वन विभागाच्या जाचक अटी व वन्यप्राण्यांच्या हत्येवर बंदी असल्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यांना मुबलक प्रमाणात चारा मिळत नसल्यामुळे ते पिकांवर हल्ला करीत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात शेतकरी अपयशी ठरत आहेत. त्याची झळ सामान्य शेतकऱ्याला सोसावी लागत आहे. या आधीही पावसाळी धानपिकाचीसुद्धा अशीच नासाडी केली होती. तेव्हा फक्त त्यांना सात हजार रुपये मिळाले. नुकसान लाख ते दीड लाखाचे आणि मदत सात हजारांची ? कसा जगेल शेतकरी ? वन विभागानी नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या धान पिकाची पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.