शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीला केपीसीएल अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वसूचनेनुसार सोमवारी कर्नाटक पाॅवर काॅर्पोरेशन लिमिटेडमधील प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासंबंधात केपीसीएलच्या प्रबंधकीय संचालक व ...

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वसूचनेनुसार सोमवारी कर्नाटक पाॅवर काॅर्पोरेशन लिमिटेडमधील प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासंबंधात केपीसीएलच्या प्रबंधकीय संचालक व संबंधित अन्य अधिकाऱ्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. प्रशासनाच्या या आदेशाला केपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. एकंदरीत केपीसीएलचे अधिकारी प्रशासनास जुमानत नसल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप हंसराज अहीर यांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्तांचे, कामगारांचे प्रलंबित प्रश्न थकीत वेतन दिला नसतांनाही प्रकल्पग्रस्तांच्या पोटावर लाथ मारून कर्नाटक सरकारच्या या प्रकल्पाला कोळसा उत्खननाची परवानगी दिली जाते हे दुदैव आहे, असेही अहीर म्हणाले.

जिल्हा प्रशासनाला अहीर यांचा इशारा

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर दि. १९ मार्चला पुन्हा बैठक लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. या बैठकीला केपीसीएलचा अधिकारीवर्ग उपस्थित झाला नाही, तर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या हितासाठी प्रशासनाने परवानगी रद्द करण्याचे धाडस दाखवावे. आपल्या हक्कासाठी प्रकल्पग्रस्त व कामगार पुढील लढ्यास सज्ज राहील व खाणीतील उत्खनन बंद पाडेल, असा सज्जड इशारा हंसराज अहीर यांनी या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस भद्रावती पं. स. चे सभापती प्रवीण ठेंगणे, नरेंद्र जिवतोडे, संजय ढाकने, नगरसेवक प्रशांत डाखरे व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.