शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

दादांच्या समाधीस्थळाने अड्याळ टेकडीच्या सौंदर्यात आणखी भर

By admin | Updated: November 24, 2015 01:21 IST

गीताचार्य तुकारामदादा यांना अड्याळ टेकडीवर ज्या ठिकाणी चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी शेगाव येथील गजानन महाराज

बांधकाम अंतिम टप्प्यात : शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचा पुढाकारघनश्याम नवघडे ल्ल नागभीडगीताचार्य तुकारामदादा यांना अड्याळ टेकडीवर ज्या ठिकाणी चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी शेगाव येथील गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने समाधीस्थळाचे विलोभनीय बांधकाम सुरू आहे. या बांधकामाने अड्याळ टेकडीच्या सौंदर्यात आणखीच भर पडणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. या अड्याळ टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्ष मौन धारण करून साधणा केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर पडले. संबंध महाराष्ट्रात व देशात त्यांचे समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवरही त्यांनी विशेष लक्ष पुरविले. अड्याळ टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सर्वभौम असे एक खेडे तर निर्माण केलेच, पण त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दीक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा या महान आणि आदर्श अशा समाजसेवकांनी ८ जून २००६ रोजी आपले इहलोकीचे कार्य कायमचे संपविले.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संबंध महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकारामदादा आणि आपले काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी दादांच्या समाधीस्थळासाठी शेगाव संस्थान दोन कोटी रुपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादांच्या समाधी स्थळाचे बांधकाम काही दिवसाअगोदर हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. समाधीस्थळाचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागीर सुद्धा राजस्थानातूनच मागविण्यात आले आहेत. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल असे जलाशय, लता वेली आणि विविध जातींच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आणि त्या टेकडीवर हे विलोभनीय बांधकाम त्यामुळे अड्याळ टेकडीचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे.