शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! पिकांच्या रखवालीसाठी रात्रभर रावट्यावर जागरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात रावट्या तयार करून रात्रभर जागरण करावे लागत आहे.

विकास खोब्रागडेलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील ताडोबाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम भागात असलेल्या पळसगाव व  परिसरातील गावात ताडोबाच्या वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांना पिके राखण्यासाठी शेतात रावट्या टाकून रात्रभर जागरण करावे लागत आहे.पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात रावट्या तयार करून रात्रभर जागरण करावे लागत आहे. सध्या शेतात हरभरा, गहू, उन्हाळी धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन्य प्राण्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली असून शेतकऱ्यांनी शेतात रावट्या उभारल्या आहेत.  रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. त्यामुळे शेतकऱ्यांवर चौफेर संकट निर्माण झाले. जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांची रखवाली करताना दिसत आहेत.  यापूर्वी या परिसरात वन्यप्राण्यांनी जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात जनावरे दगावलीही आहेत.  मात्र, पिकांवरच उदरनिर्वाह असल्याने जीव धोक्यात घालून शेतकरी पीक राखत आहेत.

नुकसान भरपाईत वाढ करण्याची गरजवन्य प्राण्यांकडून जनावरावर हल्ले झाले आहेत. पशुपालकांची  जनावरे दगावली आहेत. त्यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळते. मात्र, त्यात वाढ होणे महत्त्वाचे आहे. तोकडी मदत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे, प्रशासनाने या सर्वांची दखल घेऊन नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती