शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल स्वीकारण्यासाठी ग्राहकांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:11 IST

महावितरणतर्फे थकबाकीचा प्रश्न सोडविणे व ग्राहकांना आधुनिक सेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता महावितरण ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन वीज बिल स्वीकारणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणची नवी योजना : फिरते वीज बिल भरणा केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणतर्फे थकबाकीचा प्रश्न सोडविणे व ग्राहकांना आधुनिक सेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता महावितरण ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन वीज बिल स्वीकारणार आहे.ग्रामीण भागात वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीज बिल भरणा करण्यास ग्राहकांना अडचण येत असल्याने महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी वीजबिल भरणा मोबाईल व्हॅन म्हणजे फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात मोबाईल व्हॅनचा समावेश करण्यात येणार आहे. चामोर्शी उपविभागातील घोट, नागभीड उपविभागातील पाहर्णी, राजुरा उपविभागातील देवाडा, वरोरा उपविभाग तसेच चंद्रपूर विभागातील चंद्रपूर ग्रामीण उपविभागात मोबाईल व्हॅन वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत व ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद या मोबाईल व्हॅन वीज बिल भरणा केंद्रास लाभत आहे.या वाहनात ग्राहकांना माहिती मिळण्यासाठी उदघोषणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुरवस्ती आणि दुर्गम भागातील गावे तसेच दाट लोकवस्ती व मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेल्या गावांसोबतच समावेश करण्यात येणार आहे. ज्या गावातील वीज बिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही ही मोबाईल व्हॅन फिरविली जाणार आहे. महावितरणच्या या योजनेमुळे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.आठवडी बाजारतही फिरणार व्हॅनलवकरच इतर उपविभागातसुद्धा वीज बिल भरणा मोबाईल व्हॅन सुरु करण्यात येणार आहे. साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीज बिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या उपविभागामधील साप्ताहिक बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून या फिरत्या वीज बिल भरणा केंद्रामध्ये इंटरनेट, संगणक आणि प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या सुविधेला वीज ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा तीन महिन्यांनंतर घेण्यात येणार आहे. मिळणाºया प्रतिसादानंतर त्या ठिकाणी ही सुविधा पुढे सुरु ठेवण्याबाबत व व्याप्ती वाढविण्याबाबत विचार केला जाणार आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घेऊन वीज देयकाचा भरणा करावा.- अरविंद भादीकर, मुख्य अभियंता, चंद्रपूर वीज परिमंडळ, चंद्रपूर.