शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने ग्राहकांची तारांबळ

By admin | Updated: November 12, 2014 22:40 IST

गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची

चंद्रपूर : गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. एटीएममध्ये पैशाचा ठणठणात होता.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन या बँक कर्मचारी संघटनेच्या आजच्या संपाला प्रतिसाद देत राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक यातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग सहभागी झाले होते. त्याचा परिणाम सर्व बँकिंग उद्योगावर पडला. सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्गांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर एकत्रीत येऊन सरकारच्या कामगार विरोधी धोरण संदर्भात घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी बँक आॅफ इंडिया मुख्य शाखेसमोर आपल्या एकतेचे प्रदर्शन घडवत प्रचंड नारेबाजी व धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व दिनेश मेश्राम, प्रकाश लुतडे, देवीदास नंदनवार, सुनील जामदार, सुनील बेलखोडे, अमृतकर, खलील शेख, मो. बशीर, हवेलीकर, भाग्यश्री फाटक, मानकर आदींनी केले. बॅक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले. नागरिकांची पैसे काढण्यासाठी एटीएमवर गर्दी दिसून आली. मात्र, काही एटीएमवर पैशेच नव्हते. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. ग्रामीण भागातही हिच परिस्थती दिसून आली. (स्थानिक प्रतिनिधी)