शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:13 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.

ठळक मुद्देआज दिल्लीत निर्णयाची अपेक्षा : अन्य राजकीय पक्षांच्या तंबूतही शांतताच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.२०१४ च्या निवडणुकीत तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षांसह आरपीआय, एसपी(आय), आरपी(खोरीप), आम आदमी पार्टी, लोकभारती, आ.पा. इंडिया, एसआयटीसी, बहुजन मुक्ती, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीसह सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निश्चित झालेले आहे. उर्वरित एकाही पक्षाकडून कुणाचे नाव पुढे आले नाही. काँग्रेस हा या मतदार संघातील बलाढ्य पक्ष आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे. दिल्लीतही निर्णय व्हायला वेळ लागत असल्यामुळे कार्यकर्ते कुणाचा झेंडा हातात घ्यावा, या विवंचनेत आहे. १६ मार्च रोजी चंद्रपूर मतदार संघाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा दिल्लीत गेल्या सोमवारपासून तळ ठोकून असलेली काँग्रेसची मंडळी सांगत आहे. मात्र याबाबतही ते साशंक आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिनांकापर्यंतही उमेदवारीचा निर्णय लांबला जाऊ शकतो, असा संशयही ते वर्तवित आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेसकडून एकाही नावावर स्थानिक पक्ष नेतृत्व ठाम नसल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. आपच्या उमेदवाराने तब्बल २ लाख ४ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. आता निवडणूक काही दिवसांवर असतानाही आम आदमी पार्टीची निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. ४९ हजार मते घेऊन बसपा चौथ्या क्रमांकावर होती. या निवडणुकीत बसपाकडून अद्यापही हालचाली होताना दिसत नाही. वास्तविक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत अन्य राजकीय पक्षांच्या तंबूत शांतताच राहतील, असे बोलले जात आहे. काँग्रेस उमेदवार जनतेपुढे आल्यानंतरच या निवडणुकीला रंग चढतील, असेही बोलले जात आहे.