शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

चंद्रपुरात बोगस डॉक्टरांवर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:17 IST

ग्रामीण भागासारखे आता चंद्रपुरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई केली.

ठळक मुद्देमनपाचे धाडसत्र : बंगाली कॅम्पमध्येही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागासारखे आता चंद्रपुरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई केली.खुशाल रामदास खेरा असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. या बोगस डॉक्टरांबाबतच्या अनेक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील तक्रारीची दखल घेत मनपाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकासह शहरात धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी खेरा हॉस्पिटल श्यामनगर, बंगाली कॅम्प येथे सायंकाळी भेट दिली. तेथे खुशाल रामदास खेरा नावाचा व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना दिसून आला. सदर व्यवसायिकाने खेरा हॉस्पिटल नावाचा बोर्ड तेथे लावलेला होता. बोर्डवर डॉ. के. आर. खेरा, (बि.ए.एम.एस. (एमडी) ), मुंबई या पदव्यांचा उल्लेख आढळून आला. दवाखान्यात चौकशी केली असता व्यावसायिक जागेत आयुर्वेदिक औषधीचा वापर तसेच रुग्णांची तपासणी करीत असताना हा डॉक्टर आढळून आला. मात्र त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी वा नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले नाही. सदर कारवाई मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अंजली आंबटकर, डॉ. जयश्री वाडे, सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, औषधी निरीक्षक श्रीकांत फुले यांनी केली.डॉक्टर बारावीही उत्तीर्ण नाहीमहाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांकडे वैद्यकीय व्यावसायिकाने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सदर डॉक्टरला वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय शैक्षणिक अहर्ता तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणीचे प्रमाणपत्र याबाबत मागणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृत कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. इतकेच नाही तर तो १२ वीसुद्धा पास नसल्याचे कळाले. चौकशी दरम्यान सदर व्यवसायिक आयुर्वेदिक औषधीचा वैद्यकीय व्यवसाय करतो, असे आढळून आले. चौकशीत दवाखान्यात आयुर्वेदिक औषधेही आढळून आली. रामनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून खेरा याला अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.