शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन

By राजेश भोजेकर | Updated: August 10, 2023 11:04 IST

मंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा मिळाला बहुमान : कल्पकता आणि तत्परतेवर शिक्कामोर्तब

चंद्रपूर : कल्पकता आणि तत्परता या दोन वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाणारे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे ना. मुनगंटीवार अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कार्यालयाला हा बहुमान बहाल करण्यात आला होता. नावीन्यपूर्ण संकल्पना, विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी, भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचे निरसन व्हावे यासाठी उपयुक्त यंत्रणा आणि कार्यपद्धती यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यालय ओळखले जाते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय अशा तीन खात्यांची जबाबदारी असूनही अत्यंत वेगाने अंमलबजावणी करण्यासाठी ना. मुनगंटीवार यांचे कार्यालय सदैव तत्पर असते. सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या मंत्र्यांच्या कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

बुधवारी ‘मेरी माटी  मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आयएसओचे अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी ना. मुनगंटीवार यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

सहा वर्षांतील दुसरा बहुमान

यापूर्वी २०१७ मध्ये पहिल्यांदा बहुमान मिळाला होता.गेल्या सहा वर्षांत मंत्री म्हणून ना. मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला मिळालेला हा दुसरा बहुमान आहे. मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे, त्यांना अकारण ये-जा करावी लागू नये, यासाठी त्यांच्या तक्रारींची, निवेदनाची दखल घेत त्यांच्या कामासंदर्भातील पाठपुरावा करण्याची कार्यपद्धती या कार्यालयात अवलंबली जात आहे. 

कामांचे शिस्तबद्ध नियोजन

मंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी ते अगदी लिपिकापर्यंत कामांचे शिस्तबद्ध नियोजन केले जाते. प्रत्येकाची कार्यपद्धती ठरवून देण्यात येत असून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी स्वत: मंत्री ना. मुनगंटीवार सातत्याने आग्रही असतात आणि त्यासंदर्भात पाठपुरावाही करतात. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल आयएसओ प्रमाणपत्राच्या माध्यमातून सलग दुसऱ्यांदा घेण्यात आली आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार