शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या दाहकतेने पिके करपली

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून

चंद्रपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून शेतातील पीके करपू लागली आहे. सोमवारी जिल्ह्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. मात्र ती शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाही.जिल्ह्यात असलेली परिस्थिती सर्व जिल्हाभर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. पाण्याअभावी कपरणारी पिके पाहून शेतकऱ्यांना अश्रु आवरणे कठीण झाले आहे. दुबार, तिबार पेरणीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळाला नाही. दररोज उन्हाळ्यासारखे उन्ह पडत आहे. नदी- नाले कोरडे असून सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारनियमनाने हतबल झाले आहे. अशा स्थितीत उडीद, मुंगाची पेरणीही झाली नाही. साधातरण: पोळ्याच्या हंगामात उडीद- मुंगाचे पीक हाती येते. त्यावर पोळा साजरा केला जातो. परंतु यंदा त्याचीही सोय नाही. दुष्काळाचे स्पष्ट सावट ग्रामीण भागात दिसत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पावसाची काळजी आहे. पाण्याअभावी करपणारे पीक पाहून शेतकऱ्याचा जीवाची घालमेल होत आहे.यासोबतच पाऊस न आल्याने वैराणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोळ्याच्या महिन्यात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असतो. परंतु यंदा तीही स्थिती नाही. जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. अनेकांनी तर नाईलाजाने आपली जनावरे विक्रीस काढली आहे. शासनाने तालुक्याला टंचाईग्रस्त घोषित केले असले तरी त्याचा लाभ मात्र कितपत मिळतो हे महत्त्वाच आहे.यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. मागील वर्षी अतिपावसामुळे पिकांची नासाडी झाली तर यावर्षी पाऊसच आला नसल्याने हातात पीक येण्याची चिन्ह नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)