शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वढा-जुगादच्या संगमावर उसळणार गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:06 IST

अकराशे वर्षापूर्वीचे दुर्लक्षित जुगाद येथील प्राचीन हेमाडपंती शिवमंदिराचे २००३ मध्ये जीर्णोदाराचे काम पूर्ण करण्यात आले.

ठळक मुद्देप्रशासनाकडून चोख व्यवस्था : यात्रेसाठी विशेष बसगाड्यांची सोय

आॅनलाईन लोकमतघुग्घुस : अकराशे वर्षापूर्वीचे दुर्लक्षित जुगाद येथील प्राचीन हेमाडपंती शिवमंदिराचे २००३ मध्ये जीर्णोदाराचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी भरत असलेल्या यात्रेत भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने मंदिर कमिटीकडून चंद्रपूरवरून वढा गावापर्यंत यात्रा बसगाड्यांची सोय केली आहे.वर्धा नदीवर तात्पुरता सेतु बनविण्यात आला असून महाशिवरात्रीला येथे यात्रा भरणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून मंदिर प्रशासन व्यवस्थेत मग्न असून मंदिरात होमहवन विधीवत सुरू करण्यात आले आहे.घुग्घुसपासून नजीकच असलेल्या जुगाद हे २०-२५ घराचे गाव आहे. गावालगत उंचावर टेकडी असून त्याठिकाणी नवव्या दशाकापासूनचे मंदिर आहे. मात्र त्या प्राचीन शिलाकृती असलेल्या वर्धा-पैनगंगा वडीचा संगम आणि उत्तम वाहिनीवर उभे होते. त्या मंदिर परिसरात भरदिवसा जाण्याची हिंमत होत नव्हती.मात्र हे क्षेत्र घुग्घुस पोलीस ठाण्याच्या क्षेत्राच्या बाहेरील असतानाही तत्कालीन ठाणेदार पुंडलिक सपकाळे यांनी मंदिराच्या जीर्नोद्वाराचे काम घुग्घुस व त्या परिसरातील सर्व धर्मीयांच्या मदतीने काम सुरू केले. त्यामुळे या मंदिराचा कायापालट झाला. आज जुगाद शिवमंदिर चमकत असून २००३ पासून सुरू करण्यात आलेल्या येथील यात्रेत पंचक्रोशीतील हजारो भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येथे येत असतात.