शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘क्रॉपसॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:15 IST

जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हा समिती गठित : दर दोन आठवड्याने घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या समितीमार्फत क्रॉपसॅप योजनेला गती देवून कापूस पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण केले जाणार आहे. ही समिती दर दोन आठवड्यात आढावा घेणार आहेत.मागील वर्षी बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कापूस पीक नष्ट केले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला. शेकडो शेतकºयांना लागवडीचा खर्चही मिळाला नाही. बºयाच शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली होती.परंतु, पीक हाती न आल्याने कर्ज कसे भरावे, हा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला होता. सोयाबीन पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. बहुतांश शेतकºयांनी बीटी बियाण्यांची लागवड केली. या वाणांच्या प्रसारानंतर सुरूवातीच्या काही वर्षात चांगले उत्पादन झाले होते.मात्र बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या हंगामातही हीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.ही समिती जिल्ह्यातील तालुकानिहाय दौरे करून कापसाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक तसेच राज्याच्या कृषी आयुक्तांना सादर करणार आहेत.समितीमध्ये बारा जणांचा समावेशबोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये १२ अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार हे अध्यक्ष असून यामध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील जबाबदारी सांभाळतील. समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हा उपनिबंधक, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक, कृषी विद्यापीठाचे जिल्हा प्रतिनिधी, केंद्रीय कृषी संशोधन संस्थेचे तज्ज्ञ, जिल्हा कृषी विकास अधिकारी, महाराष्ट कृषी उद्योग महामंडळाचे प्रतिनिधी, जिनींग मिल्सचे प्रमुख, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचा व किटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचा प्रतिनिधी सहभागी आहेत.समितीची कार्यपद्धतीही समिती कापूस उत्पादक तालुक्याचा परिस्थितीनुसार दर १५ दिवसांत आढावा घेणार आहे. यामध्ये पीक परिस्थिती क्रॉपसॅप योजना, कीडरोग प्रादुर्भावाची सद्यस्थितीवर उपाययोजना आणि स्थानिक शेतकºयांच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकºयांची संपूर्र्ण माहिती संकलीत करून लगेच उपाययोजना करणार आहेत.