शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खरिपात तूर, कापसाचे क्षेत्र वाढणार

By admin | Updated: May 21, 2016 01:05 IST

तूर, कापूस व सोयाबीन हे पीक रोखीचे समजले जातात. त्यामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून ही तीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

सोयाबीन क्षेत्र घटणार : वरोरा तालुका कृषी विभागाचा आराखडावरोरा : तूर, कापूस व सोयाबीन हे पीक रोखीचे समजले जातात. त्यामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून ही तीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परंतु यावर्षी खरीप हंगामात वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र घटणार असून तूर व कापसाच्या पेऱ्यात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. सोयाबीन पीक कमी खर्चाचे व अल्पावधीत उत्पादन देणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाला प्राधान्य देत होते. सोयाबिन निघाल्यानंतर इतरही पीक या शेतात घेत होते. परंतु मागील काही वर्षात सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना धोका देणे सुरु केल्याने या हंगामात शेतकरी सोयाबीन पीक घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. वरोरा तालुक्यात खरीप हंगामात ६४ हजार ५०० हेक्टर मध्ये शेतकरी पिकाची लागवड करीत असतात. यात भात ३० हजार हेक्टर, सोयाबिन १२ हजार ५०० हेक्टर, कापूस ३९ हजार ५०० हेक्टर, तूर ९ हजार ५०० हेक्टर इतर पिके ७५० हेक्टर मध्ये घेतली जाते. या हंगामात कापूसाचे क्षेत्र २५०० हेक्टरने वाढला आहे तर सोयाबीनचा पेरा २५०० हेक्टरनी कमी तर तूर पिकाचा पेरा एक हजार हेक्टरने वाढ होणार आहे. यावर्षी भाताला ७५० क्विंटल, सोयाबीनला ९ हजार ३७५ क्विंटल, कापूस बियाणे २ लाख ६६ हजार पाकिटे, तूर २५० क्विंटल बियाणे लागणार आहे. खरीप हंगामात युरिया ५ हजार ५०० मेट्रिक टन, डीएपी २४०० मेट्रिक टन, एमओपी ६०० मेट्रीक टन, फॉस्फेट २००० मेट्रिक टन, १५.१५.१५ ४५० मेट्रिक टन खते लागणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)खते घेताना सावधान !मागील काही वर्षापासून गावागावांमध्ये जाऊन काही कंपन्या खताची विक्री करीत आहेत. सेंद्रिय खताच्या नावाखाली खताची विक्री केली जात आहे. त्यामध्ये गुणवत्तेचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची अनेकदा फसगत झाली. विक्री करणाऱ्या कंपन्या अ‍ॅक्टमध्ये बसत नसल्याने तक्रार होऊनही कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी.