शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

२ हजार ७७७ शेतकऱ्यांना ४ कोटी ९० लाखांचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:37 IST

२०१८- १९ या खरीप हंगामात ५४ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला होता. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून ६ कोटी २९ लाख २१ हजार ६८६ ची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली.

ठळक मुद्देमागील खरीपाची स्थिती : जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१८- १९ या खरीप हंगामात ५४ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला होता. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून ६ कोटी २९ लाख २१ हजार ६८६ ची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली. पीक विम्याच्या निकषात पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २ हजार ७७७ शेतकऱ्यांना ४ कोटी ९० लाख ५५ हजार ६२३ रूपयांचा मोबदला देण्यात आला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांचा विमा काढता येतो. नैसगिक आपत्तीपासून नुकसान झाल्यास राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे हा विम्याचा मोबदला दिला जातो. नवीन नियमानुसार चालू वर्षातील सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंद झाली तरच नुकसान भरपाई मिळते. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान काढणी पश्चात नुकसान, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीची पीक विम्याची भरपाई मिळते. पीक विमा रक्कमेच्या दोन टक्के नगदी व व्यापारी पिकासाठी ५ टक्के विमा हप्ता भरावा लागतो. अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या विमा बँकेमार्फत आपोआपच केला जातो. विमा रक्कम ही कर्जाबरोबर अतिरिक्त मंजूर केली जाते.२०१८-१९ या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विम्याची माहिती पोहोचविल्याने शेतकºयांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मागील खरीप हंगामात ५४ हजार ५७० हेक्टर क्षेत्र पीक विम्याच्या कक्षेत आले होते. शेतकºयांकडून पीक विमा हप्ता म्हणून ६ कोटी २९ लाख २१ हजार ६८६ रूपये विमा कंपनीकडे जमा करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारकडून विमा हिस्सा म्म्हणून कंपनीला देण्यात आला होता. जिल्ह्यातील २ हजार ७७७ शेतकरी निकषात पात्र ठरल्याने ४ कोटी ९० लाख ५५ हजार ६२३ रूपयांचा मोबादला वितरीत करण्यात आला आहे.जिल्ह्यातील १५ पिकांसाठी विमा लागूजिल्ह्यातील १५ पिकांना विमा लागू करण्यात आला आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तिळ, सुर्यफुल, कारले, कापूस व खरीपातील कांदा आदी पिकांचा समावेश आहे. कर्जदार शेतकºयांकडून विमाचा हप्ता जमा केल्या जातो. मात्र, बिगर कर्जदार शेतकºयांना विहित नमून्यातील विमा प्रस्ताव, सातबारा पीक पेरणीबाबत स्वयंघोषणा पत्र, आधार कार्ड, व रोख विम्या हप्त्यासह अंतिम मुदतीपर्यंत स्वत:चे बँक खाते असलेल्या जवळच्या बँकेत किंवा सीएससी केंद्रात अर्ज सादर करता येते.पीक विमा प्रस्तावाची मुदत वाढवावीखरीप २०१९ हंगामाकरिता प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २४ जुलै २०१९ पर्यंत ठेवण्यात आली. जिल्ह्यात बहुसंख्याक शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ही मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. या विम्याचा हप्ता धान पिकासाठी ८२५ रूपये, तुरीसाठी ६३० तर कापसाठी २०१९ रूपये आकारण्यात आला आहे.तालुका समितीची जबाबदारीयोजनेच्या अंमलबजावणी संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या निवारणासाठी मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून तालुका समितीकडे जबाबदारी देण्यात आली.योजनेसंबंधी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने समिती काम करेल.योजनेसंंबंधी ‘आपले सरकार सेवा’ केंद्राच्या कामकाजावर समितीचे सनियंत्रण राहणार आहे.तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकेच्या शाखांमार्फत करण्यात येणाऱ्या योजनेच्या सहभागाबाबत सनियंत्रण करणे.नोंदणी संदर्भातील तक्रारींबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार विभागस्तरीय व जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा