शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:32 IST

पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा समस्यांच्या विळख्यात : शेतकऱ्यांची झोपच उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.केवळ आणि केवळ पावसाच्या भरवशावर उभा राहण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करतो. मागील वर्षी धान पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. कर्ज काढले, तेही पुरते फेडले गेले नाही. यावर्षी पुन्हा कर्ज काढून पीक जोमाने उभे केले. मात्र वन्यप्राण्यांनी उभे पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे.मागील दोन महिन्यांपासून शेतकरी सुखाने झोपलेला नाही. अगदी मावळतीच्या पूर्वी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास २० ते २५ च्या समुहाने येणाऱ्या रानडुकरांनी उभ्या लोंबाच्या धानपिकांत प्रचंड हैदोस घालणे सुरू केले आहे. साधरणत: सायं ४ वाजताच्या सुमारास उब्बा घेऊन शेतकरी घराबाहेर पडतो. आणि रानडुकरांना हाकलून लावण्यासाठी वारंवार ओरड करीत असतो. रात्रभर डोळ्यांना झोप नाही, अशा स्थितीतही त्यांनी पिकांना सरंरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अनेक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले. यापूर्वीचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनविभागाकडे पडून आहे. त्याची चौकशी होईल. त्या चौकशीत वेगवेगळे सदस्य एकत्रित जमा होतील. त्यानंतर नुकसान भरपाई किती द्यायची ते ठरवतील. ही दरवर्षीची समस्या आहे. स्थानिक रोजगार नाही. दुधाळू जनावरांना ही वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी चारा नाही. नेमके शेतकºयांनी काय करायचे, हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर सध्या उभा ठाकला आहे.