शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:00 IST

शुक्रवारी रात्री अचानक वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या शेतात पाणी शिरले. यात सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतातील जनावरांचा चाराही खराब : सोयाबीन व कापूस पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कपिपरी (देशमुख) : शुक्रवारी रात्री अचानक वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या शेतात पाणी शिरले. यात सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याशिवाय शेतात असलेला जनावरांचा चाराही उद्ध्वस्त झाला. दरम्यान, शनिवारीदेखील नदीचे पाणी वाढत असल्यामुळे कोच्ची-घोनाड मार्गावरील पुलावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप एकही मार्ग बंद झालेला नाही. मात्र पाणी असेच वाढत गेल्यास काही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पिपरी देशमुख येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नदीच्या पात्रात बुडाली आहे. मोटारपंपही वाहून गेल्यामुळे ग्रामपंचयतीद्वारे गावात होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. यात ग्रामपंचायतीचेही ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पूरबुडित क्षेत्राचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्व शेतकºयांकडून केली जात आहे.पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने शेळ्यांचा मृत्यूवरोरा : नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी नजिकच्या गोठ्यात शिरल्याने गोठ्यातील शेळ्या व कोंबड्यांचा मृत्यू झाला. यात संबंधित शेतकऱ्याला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. सदर घटना वरोरा शहरानजिकच्या सुर्ला गावात शुक्रवारी घडली. वरोरा शहरानजिकच्या बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुर्ला गावाजवळ योगेश व रवींद्र देसाई या भावंडांचे शेत आहे. दोघेही शेतीला जोडधंदा म्हणून मागील काही वर्षांपासून शेतात गोठे बांधून शेळी पालन व कुक्कुट पालनाचा व्यवसाय करीत आहेत. शेताजवळच एक नाला वाहतो. गुरुवारी व शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात गोठ्या नजिकच्या नाल्याला पूर आला. पुराचे पाणी गोठ्यात शिरले. ही बाब देसाई कुटुंबीयांना माहित होताच त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. परंतु पुराचे पाणी अधिक असल्याने त्यांना गोठ्यापर्यंत जाता आले नाही. पुराच्या पाण्यात गोठा बुडाल्याने गोठ्यातील शेळ्या व कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला. यात देसाई कुटुबीयांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.