शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

रस्त्यांवरील मोकाट जनावरे गंभीर समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

नगरपालिका, नगरपंचायती व मोठ्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश खा. धानोरकर यांनी दिले. मोकाट जनावरांमुळे जिल्ह्यांमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावे लागत असून पशुपालकांनी या जनावरांची योग्य जबाबदारी घ्यावी व अपघात होणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही खा. धानोरकर यांनी केले.

ठळक मुद्देखासदार धानोरकर : रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत धोकादायक ठिकाणांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील अपघातप्रवण स्थळांच्या संदर्भात करावयाच्या दुरुस्तीवर शनिवारच्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे गंभीर समस्या झाली आहे. वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोकाट जनावरांवर कारवाई करावी, मालकांवर मोठया प्रमाणात दंड ठोठावावा तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख महामार्गाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याची आखणी करण्यात यावी ,असे निर्देश खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिले.चंद्रपूर जिल्ह्यातील महामार्ग व तसेच प्रमुख मार्गांवरील रस्त्यांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत करण्यात आली. खासदार सुरेश धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव, महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस.पी फासे, परिवहन अधिकारी विनय शिंदे, यांच्यासह महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.या बैठकीमध्ये नगरपालिका, नगरपंचायती व मोठ्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश खा. धानोरकर यांनी दिले. मोकाट जनावरांमुळे जिल्ह्यांमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावे लागत असून पशुपालकांनी या जनावरांची योग्य जबाबदारी घ्यावी व अपघात होणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही खा. धानोरकर यांनी केले.जिल्ह्यातील अनेक गावांच्या नावांचे फलक गायब असून ज्या ठिकाणी गावांच्या नावाची फलके नाहीत ती लावण्यात यावीत. गावे येण्यापूर्वी ही फलके असावीत व अशा फलकांची चोरी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर महानगरातील विशेषता जुन्या शहरांमध्ये रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. वाहतुकीला कोणतीही शिस्त नाही. शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. चंद्रपूर शहरातील वाहतूक शाखेने याबाबत गांभीर्याने काम करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.अपघातप्रवण स्थळांची सचित्र माहिती सादरजिल्ह्यातील २५ अपघातप्रवण स्थळांची सचित्र माहिती सादर करण्यात आली. या ठिकाणचे व्हिडिओदेखील दाखविण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकदा पाहणी करण्याची गरज खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केली. तसेच यासाठी दौऱ्याची आखणी करण्याचे निर्देश संबंधित अभियंत्यांना दिले.वाहनांना रिफ्लेक्टर लावामहामार्गावर असणाऱ्या सर्व गावातील छोटया सायकलीपासून तर बैलबंडीपर्यंत सर्वांना रिफ्लेक्टर लावण्यात यावे. त्यासाठीची मोहीम राबविण्यात यावी. तसेच बंद पडलेल्या गाडयांना लगेच हटविण्याची कार्यवाही जिल्ह्यामधील टोल वसुली करणाºया कंत्राटदारांनी तातडीने करावी, असे निर्देशही खा. बाळू धानोरकर यांनी दिले.जिल्ह्यातील २५ अपघातप्रवण स्थळांची सचित्र माहिती सादर करण्यात आली. या ठिकाणचे व्हिडिओदेखील दाखविण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकदा पाहणी करण्याची गरज खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केली. तसेच यासाठी दौºयाची आखणी करण्याचे निर्देश संबंधित अभियंत्यांना दिले.वाहनांना रिफ्लेक्टर लावामहामार्गावर असणाऱ्या सर्व गावातील छोटया सायकलीपासून तर बैलबंडीपर्यंत सर्वांना रिफ्लेक्टर लावण्यात यावे. त्यासाठीची मोहीम राबविण्यात यावी. तसेच बंद पडलेल्या गाडयांना लगेच हटविण्याची कार्यवाही जिल्ह्यामधील टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदारांनी तातडीने करावी, असे निर्देशही खा. बाळू धानोरकर यांनी दिले.ही कामे तातडीने कराया बैठकीमध्ये आनंदवन वरोरा येथील हायवेवर वाढत असलेल्या अपघाताबद्दल अतिशय गंभीर चर्चा झाली. या ठिकाणच्या उड्डाणपुलाच्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच पडोळी, खुटाळा, तादाळी, घोडपेठ, सोमठाणा, कोंडा फाटा, मालू पेट्रोल पंप, टेम्बुर्डा, खंबाळा, चारगाव, मोहाडी, हडोर्ली, लोहारा, वळणी फाटा, चिचपल्ली, बंगाली कॅम्प, केसला घाट, खेडी फाटा, वायाळ, चुनाळा टी पाँईट, सोंडो पंढरपोर्नी, आर्वी, बीबी टि पॉईंट, प्रसंना पेट्रोल पंप, धानोरा फाटा, आदी स्थळांवरील रस्ता विस्तारीकरण, फलक लावणे, झेब्रा क्रॉसिंग करणे,दुभाजकांची दुरुस्ती करणे, थर्मा पेंट करणे, स्पीड लिमिट बोर्ड लावणे, सूचना फलक लावणे, आदी कामे तातडीने करावे, अशा सूचना यावेळी खा. धानोरकर यांनी केल्या.