शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयसच्या मृत्यूस जबाबदार दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 18, 2016 00:46 IST

साई वर्धा पॉवर व डीएनआर इम्फ्रा या कंपन्यांनी अवैधरीत्या खोदकाम करुन खड्डे तयार केले.

न्यायालयाचे आदेश : वरोरा तालुक्यात घडली होती घटनावरोरा : साई वर्धा पॉवर व डीएनआर इम्फ्रा या कंपन्यांनी अवैधरीत्या खोदकाम करुन खड्डे तयार केले. त्यामधील पाण्यात एका शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला कंपन्या जबाबदार असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या मृत्यूस व्यवस्थापनाला जबाबदार धरून गुन्हे दाखल करावे म्हणून वरोरा न्यायालयात विनोद खोब्रागडे यांनी २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल देत कंपन्यावर सदोष मनुष्य वध ३०४ (अ) व गौन खनिज चोरी प्रकरणी ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश वरोरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले.गतवर्षी वरोरा शहरातील श्रेयस खारोडे या विद्यार्थ्यांचा वर्धा नदीतील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वरोरा तालुक्यात अनेक खासगी कंपन्या अवैधरीत्या खोदकाम करीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. खोदकामामुळे खोल खड्डे पडून त्यात पाणी साचले याची कुठलीही दखल कंपन्या घेत नाही. यामुळेच श्रेयस खारोडे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे व्यवस्थापनावर सदोषवध व गौण खनीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद खोब्रागडे यांनी करत वरोरा येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग ए.एस. देशपांडे यांनी १३ मे रोजी विनोद खोब्रागडे यांच्या अर्ज अंशत: मंजूर करीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रमाणे कलम ३०४ अ व ३७९ भारतीय दंड विधान अंतर्गत मे. साई वर्धा पॉवर कंपनी व्यवस्थापक मोहबाळा व मे. डीएनआर इम्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर व कॅन्स्ट्रक्शन कंपनी मार्डाविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. (लोकमत चमू)