शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खते, बियाणेप्रकरणी चौघांवर गुन्हा; विक्रीवरही बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

बियाणे कायदा १९६६ अन्वये विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अधिक सूचित म्हणून जाहीर केलेल्या जातींच्या बियाण्यांची  विक्री करताना बियाणे  विक्रेत्याने महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. विक्रीसाठी ठेवलेल्या बियाण्याचे पोते, पिशवी, डबा अथवा अन्य प्रकारे बियाणे ठेवल्यास त्यावर बियाण्याचा खरा दर्जा दाखविणारे सूचीपत्र किंवा निशाणी, खूणचिठ्ठी असली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बनावट बियाणे, कीटकनाशक आणि खते विकल्याप्रकरणी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने वर्षभरात १३ केंद्राना विक्रीस बंदी घातली तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट प्रकार घडू नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.बियाणे कायदा १९६६ अन्वये विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अधिक सूचित म्हणून जाहीर केलेल्या जातींच्या बियाण्यांची  विक्री करताना बियाणे  विक्रेत्याने महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. विक्रीसाठी ठेवलेल्या बियाण्याचे पोते, पिशवी, डबा अथवा अन्य प्रकारे बियाणे ठेवल्यास त्यावर बियाण्याचा खरा दर्जा दाखविणारे सूचीपत्र किंवा निशाणी, खूणचिठ्ठी असली पाहिजे. या खूण चिठ्ठीवरील माहितीच्या सत्यतेबद्दलची जबाबदारी बी विक्रेत्याची राहील. बियाणे अप्रमाणित असले तरी खूणचिठ्ठी ठराविक रंगाची आणि आवश्यक नमुन्यातीलच असावी, बियाण्याच्या प्रत्येक गटाचा योग्य नमुना त्या गटातील त्या बियाण्याची संपूर्ण विक्री झाल्यानंतर एक वर्षापर्यंत ठेवणे  बंधनकारक आहे. प्रत्येक बियाणे गटाचे खरेदी व विक्रीबाबतचे दप्तर विक्री संपल्यानंतर तीन वर्षांपर्यंत अद्ययावत ठेवणे आवश्यक; परंतु नियम धाब्यावर बसवून विक्री केल्याचे आढळल्याने गुणनियंत्रक पथकाने वर्षभरात दोषींवर कारवाई केेली.

नोव्हेंबर अखेरपर्यंत १३८ नमुने बनावट जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अंतर्गत गुणनियंत्रक पथकाने जिल्ह्यातील गोळा केलेल्या बियाणे, खते व कीटकनाशके नमुन्यांपैकी १३८ नमुने बनावट आढळली. यामध्ये सर्वाधिक खताचे नमुने आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणेही नमुने नसल्याने संबंधित विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली. काहींवर कारवाई झाली.

१ हजार ४०३  नमुने गोळाजिल्ह्यातून १ हजार ४०३ नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये बियाणे ८२१, खते ४१८ आणि कीटनाशकांच्या १६४ नमुन्यांचा समावेश आहे. हे नमुने जिल्हा परिषदचे अर्धवेळ, तसेच राज्य कृषी विभागाच्या निरीक्षकांनी गोळा केले आहेत.

१ हजार १९१  नमुन्यांची तपासणीचंद्रपूर जिल्ह्यातून गोळा केलेल्या एकूण नमुन्यांमधून १ हजार १९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे, खते व कीटनाशके मिळावे, यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले.

शेतीसाठी उत्तम दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार संबंधित परवानाधारक विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून पुरवठा केला पाहिजे. निकृष्ट दर्जाचे साहित्य आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. तक्रारीसाठी पुढे यावे. जिल्ह्यात भरारी पथके सज्ज आहेत. - प्रशांत मडावी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :agricultureशेती