शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्मसीचालकांचा कडकडीत बंद

By admin | Updated: May 31, 2017 00:57 IST

आॅनलाईन फार्मसीला विरोध करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला होता.

आॅनलाईन विक्रीला विरोध : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आॅनलाईन फार्मसीला विरोध करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला होता. त्याचे औचित्य साधून चंद्रपूर येथे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने कडकडीत बंद पाडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला.अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बंदची हाक दिली होती. या मोर्चाचे नेतृत्त्व असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल एकरे यांनी केले. संपूर्ण देशामध्ये आॅनलाईन फार्मसी व्यवसाय सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात ई-फार्मसी हा बेकायदेशीर व्यवसाय असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष एकरे यांनी केला. असोसिएशनच्या सदस्य फार्मसी संचालकांनी जटपुरा गेटमार्गे मोचार काढला. तो जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ गेला. तेथे या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढण्यात आला.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नार्कोटिक्स ड्रग, झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप आदी अनेक धोकायदायक औषधी आहेत. त्याची विक्री आॅनलाईन करणे हानीकारक आहे. याकडे प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या आंदोलनात असोसिएशनचे सचिव विनोद बुद्धावार, उपाध्यक्ष सचिन चिंतनवार व विलास कासनगोट्टूवार, निवासी उपाध्यक्ष रवींद्र आसूटकर, कोषाध्यक्ष प्रशांत जाजू, अनुप विग्नेश्वर, रणजित दांडेकर, रतन शिलावार यांच्यासह अनेक जण सहभागी होते.