शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

‘गर्भसंस्कारा’तून घडवा देशभक्त पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

चंद्रपूर : जगात शक्तिशाली देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची अनेक कारणे आहेत. परंतु, त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण ...

चंद्रपूर : जगात शक्तिशाली देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची अनेक कारणे आहेत. परंतु, त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी ओळखलेले गर्भसंस्काराचे महत्त्व आणि त्यांनी सुरू केलेली विशेष योजना होय. त्यामुळे देशभक्ती कृतीत आणणारी व सुदृढ पिढी घडवण्यासाठी गर्भवती मातांनी गर्भसंस्कारांचे महत्त्व ओळखणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर माता लाभार्थींना अनुदान किट वाटप कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. योजनेची माहिती डिजिटल पुस्तिकेमार्फत तसेच इतर माध्यमांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी मनपाच्या वतीने महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, सभागृह नेता संदीप आवारी, सभापती छबू वैरागडे, महिला व बालकल्याण सभापती चंद्रकला सोयाम, महिला व बालकल्याण उपसभापती पुष्पा उराडे, गटनेत्या जयश्री जुमडे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, माजी जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शहरातील नोंदणी झालेल्या ७१ गर्भवती मातांना प्रमाणपत्र व किट वितरित करण्यात आले. यावेळी महापौर कंचर्लावार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, संचालन सुनीता अडबाले यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका सविता कांबळे, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक सचिन भोयर, ॲड. राहुल घोटेकर आदी उपस्थित होते.