शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यादी तयार; प्रतीक्षा आघाडीच्या घोषणेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 01:42 IST

जिल्हा परिषदेच्या ५६ जागा व पंचायत समितीच्या ११२ जागांची काँग्रेसची यादी तयार असून आघाडीसाठीची

काँग्रेसचे एबी फॉर्म रवाना : भाजप, शिवसेनेचीही केवळ औपचारिक घोषणा बाकी चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ जागा व पंचायत समितीच्या ११२ जागांची काँग्रेसची यादी तयार असून आघाडीसाठीची चर्चा अद्याप पूर्ण झाली नसल्याने केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. असे असले तरी पक्षाचे एबी फॉर्म त्या त्या विधानसभा क्षेत्रात रवाना झाले आहे. भाजपा आणि शिवसेनेचीही यादी पूर्ण झाली असून तिथेही घोषणेची औपचारिकता बाकी आहे. १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याला केवळ १७ दिवस उरले आहेत. मात्र राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादीच जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी व उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळावा, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतेही याच कामात दिवसरात्र गुंतले आहेत. काँग्रेसची ५२ जागांची यादी पूर्ण झाली असून केवळ चार जागांवर एकमत व्हायचे आहे. त्यामुळे या चार जागांबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे निर्णय घेणार असल्याचीही माहिती आहे. प्रदेश काँग्रेस कमेटीचे महामंत्री अनंत घरड आणि रामकिशन ओझा हे एबी फार्म घेऊन आज सोमवारी चंद्रपुरात दाखल झाले. चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एका मोठ्या हॉटेलात आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, विधानसभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजुकर, माजी आमदार सुभाष धोटे, आसावरी देवतळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते. यावेळी विधानसभानिहाय या नेत्यांना एबी फार्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून रिंगणात उतरणार आहे. या आघाडीसाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या १६ जागांची यादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिली होती. त्यातील १२ जागा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केल्या आहेत. यासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये चर्चा सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत आघाडीबाबत निर्णय होऊन यादीची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती आहे. दरम्यान, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याची जबाबदारी काँग्रेसच्या पार्लमेन्ट्री बोर्डने स्थानिक नेत्यांवर सोपविली आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे आघाडीच्या निर्णयाची जबाबदार सोपविली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस व राकाँच्या आघाडीबाबत जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत यादीची घोषणा करू नये, अशी सूचना वरिष्ठांची असल्यामुळे याबाबत निर्णय होऊन १ फेब्रुवारीला यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेही आपापली अंतीम यादी तयार केली असून यादीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोणत्याही क्षणी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. यांच्याकडे सोपविली जबाबदारी ४काँग्रेस पार्लमेन्ट्री बोर्डने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जागा वाटप व एबी फार्म वाटपाची जबाबदारी विधानसभानिहाय स्थानिक नेत्यांवर सोपविली आहे. यात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा, आ. विजय वडेट्टीवार यांच्याकडे ब्रह्मपुरी, आसावरी देवतळे यांच्याकडे वरोरा, डॉ. अविनाश वारजूकर यांच्याकडे चिमूर तर माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे राजुरा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविली आहे. हे नेते एबी फार्म घेऊन आपापल्या विधानसभा क्षेत्रात रवाना झाल्याचीही माहिती आहे. असे राहणार जागा वाटपाचे सूत्र ४काँग्रेस-राकाँ आघाडी झाल्यानंतर जागा वाटप करताना एक समिकरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार ज्या पक्षाकडे जिल्हा परिषद गटाची जागा देण्यात आली आहे, त्याच पक्षाकडे त्या जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणाची जागा असणार आहे. म्हणजेच एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती असे तीन उमेदवार त्या संबंधित पक्षाचे असणार आहे. यांच्या नावावर शिक्कामोर्तब ? ४काँग्रेसकडून उमेदवारांची यादी अधिकृतरित्या अद्याप जाहीर केली नसली तरी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे. यात शंकरपूर-डोमासाठी डॉ. सतीश वारजूकर, घोसरी-चिंतलधाबासाठी विनोद अहीरकर, देवाडा-केमारासाठी प्रकाश पाटील मारकवार, बल्लारपूर-विसापूरसाठी बाबुराव जुमनाके, नकोडा-मारडासाठी सुरज तोतडे, पळसगाव-कोठारीसाठी गोपिका बुटले, चुनाळा-विरुरसाठी गोदरुपाटील जुमनाके, नांदा-उपरवाहीसाठी शिवचंद काळे, देवाडा-राजुरासाठी सौ. नलगे, चंदनखेडासाठी दिनेश चोखारे यांचा समावेश आहे. सास्तीसाठी मामूलकर यांच्याकडून अविनाश जाधव व सुभाष धोटे यांच्याकडून बापुराव धोटे यांच्या नावाचा आग्रह केला जात असल्याची माहितीही सुत्रांनी दिली. भाजप व शिवसेनेची यादी तयार ४भाजप आणि शिवसेनेचीही यादी तयार झाली असल्याची माहिती आहे. काँग्रेसने अद्याप यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे