शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करा

By admin | Updated: August 11, 2015 01:40 IST

जिल्हयातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चंद्रपूर जिल्हयाचा एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करण्यात यावा.

सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना : सुविधा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नचंद्रपूर : जिल्हयातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चंद्रपूर जिल्हयाचा एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करण्यात यावा. यात हळद क्लस्टर, भाजीपाला क्लस्टर, लाख क्लस्टर, टसर क्लस्टर, शिंगाडा क्लस्टर, बांबू क्लस्टर, फलोत्पादन क्लस्टर व धान क्लस्टरचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभागाला दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, आत्माच्या संचालक डॉ.विद्या मानकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, कृषी विकास अधिकारी विकास देशमुख व अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना त्यांच्या जमिनीचे स्वॉईल हेल्थ कार्ड देण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हयात हळदीचे ९९३ हेक्टर लागवड क्षेत्र असून या क्षेत्रात वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. हळद या पीक लागवडीकडे शेतक-यांचा ओढा वाढत असून त्यांच्यासाठी सुविधा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. हे सुविधा केंद्र सहकारी तत्वावर शेतक-यांचेच असावे, असे ते म्हणाले. जिल्हयाचा एकात्मिक कृषी क्लस्टरचा आराखडा तयार करतांना शेतकऱ्यांशी विचार विनिमय करुन त्यांच्या सूचना यात समाविष्ट कराव्यात. भाजीपाला क्लस्टर तयार करण्यासाठी पंजाब नॅशल बँक मार्गदर्शन युनिट उभारण्यास तयार असल्याचे सांगून कोठारी या भागात भाजीपाला क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हयाच्या एकात्मिक कृषी क्लस्टरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ते म्हणाले. जिल्हयाच्या एकात्मिक कृषी क्लस्टरचा आराखडा तयार करुन एक महिण्यात सादरीकरण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. वनऔषधी, चणा क्लस्टर, कुक्कुट पालन, मासेमारी, शेंद्रीय शेती व मका याचाही समावेश करण्यात यावा. जेणे करुन शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ना.मुनगंटीवार यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)