शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांचा आरोग्यविषयक आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कोरोनाचे संकट वर्षभरात संपेल किंवा नाही याबाबत कोणीही भाष्‍य करू शकत नाही, त्‍यामुळे या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना ...

चंद्रपूर : कोरोनाचे संकट वर्षभरात संपेल किंवा नाही याबाबत कोणीही भाष्‍य करू शकत नाही, त्‍यामुळे या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे. बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सिजन घेणारा प्‍लांट तयार करण्‍याबाबत आपण जिल्‍हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्‍यांनी याला मान्‍यतादेखील दिलेली आहे. तिसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता सन्मित्र सैनिकी शाळा, सुभाष टॉकीज, बीआयटी कॉलेज, येनबोडी येथील शाळा येथे ७५० बेड्स तयार होऊ शकतात. त्‍याचप्रमाणे जुन्‍या क्रीडासंकुलातसुध्‍दा कायमस्‍वरूपी हॉस्‍पिटल उभारले जाऊ शकते. यादृष्‍टीने बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यासाठी पुढील पाच वर्षासाठी आरोग्‍यविषयक आराखडा तयार करण्‍याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीत बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, तहसीलदार संजय राईंचवार, उपविभागीय अधिकारी, ग्रामीण रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, काशी सिंह, नीलेश खरबडे, मनीष पांडे, समीर केने आदींची उपस्थिती होती.

बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रामुख्‍याने विसापूरनजीकच्‍या क्रीडासंकुलात तयार करण्‍यात येत असलेल्‍या १०० बेड डीसीएचसी रुग्‍णालयात ७० साधे बेड्स व ३० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध होतील यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, तहसीलदार संजय राईंचवार आदींनी कोरोनाविषयक उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला न.प. उपाध्‍यक्षा मीना चौधरी, नगरसेवक अरुण वाघमारे, साखरा बेगम नबी अहमद, येलय्या दासरप, सारिका कनकम, महेंद्र ढोके, जयश्री मोहुर्ले, स्‍वामी रायबरम, पूनम निरांजने, सुवर्णा भटारकर, आशा संगीडवार, गणेश बहुरिया, राकेश यादव, सुमन सिंह आदींची उपस्थिती होती.