शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

-तर पौनी प्रकल्पग्रस्तांसाठी न्यायालयाचे दार ठोठावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:00 IST

पौनी-२ व पौनी-३ च्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वकोलिने अधिग्रहीत केल्यानंतर पौनी-२ च्या ९० टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला गेला.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे धरणे

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पौनी-२ व पौनी-३ च्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वकोलिने अधिग्रहीत केल्यानंतर पौनी-२ च्या ९० टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला गेला. मात्र पौनी-३ च्या ७१० आणि पौनी-२ च्या ४२ अशा ७५२ शेतकऱ्यांना मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहे. यासाठी राजुरा तालुक्यातील साखरी येथे मागील ८९ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त साखळी उपोषणावर आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी धरणे आंदोलन दिले.दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, राज्य शासनाने २०१२ मध्ये वेकोलिमध्ये जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी सहा, आठ व दहा लाख रुपयेप्रमाणे मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुसार पौनी -२ च्या ९० टक्के शेतकºयांना मोबदला मिळाला आहे. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने नवीन कायद्यानुसार रेडीरेकनरच्या दरानुसार शेतकऱ्यांना चारपट मोबदला देण्याचा घाट रचला आहे. ज्या दरानुसार आधीच्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला. त्याचपद्धतीने या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा. स्थानिक मंत्री मंत्र्यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. मात्र आता याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी केला.जिल्हाप्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पग्रस्तांना पुढाकार घेऊन न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही यावेळी नरेश पुगलिया यांनी यावेळी दिला.धरणे आंदोलनादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी पौनी-३ प्रकल्पाला एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला मिळाला पाहिजे. प्रति सातबारा नोकरी मिळाली पाहिजे. पौनी-२ प्रकल्पामधील उर्वरित लोकांना तात्काळ मोबदला व नोकरी द्यावी. पौनी-२ व पोनी -३ हा एकच प्रकल्प असून या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे, याकडेही लक्ष वेधले.