शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी

वरोरा : कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी सात हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजारात आला. यावर्षात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वरोरा बाजारपेठेत आल्याने मागील अनेक वर्षांपासून वरोरा कापसाची बाजारपेठ मागे पडली. आता वरोरा कापूस बाजारपेठेला चांगले दिवस आल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे इतरही व्यवसाय तेजीत आल्याचे मानले जात आहे.मागील काही दशकात वरोरा ही कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. वरोरा शहरात चार, माढेळी, शेगाव येथे जिनिंग फॅक्टरी होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला होता. परंतु आधुनिकीकरणात या सर्वच जिनिंग फॅक्टरी बंद पडल्या. त्या जागेवर निवासस्थाने झाल्याने अनेक कुटुंबाचे रोजगार हिसकाविल्या गेला. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कापसाची वरोरा येथील बाजारपेठ नामशेष झाली होती. त्यामुळे वरोरा शहरातील इतर व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसला.सध्या वरोरा शहरात दोन व माढेळी येथे एक जिनिंग खाजगीरित्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी वरोरा परिसरातील कापूस व्यापारपेठेकडे वळले आहे. वरोरा परिसरात जिनिंग सुरू झाल्याने कापसाच्या पेऱ्यातही मागील काही वर्षात वाढ झाली आहे. शासनाने यावर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला आहे. हा भाव कमी असला तरी कापूस उत्पादकांना आता पर्याय नाही. या भागात उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने कापसाला भाव वाढ मिळेल किंवा बोनस मिळेल या आशेने शेतकरी आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यासारखे आहे. कापूस दर वाढीची घोषणा होईल या आशेवर कापूस उत्पादक आहे. अनेकांनी कापूस मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवला. अधिक दिवस झाल्यास कापसाची प्रतवारी खराब होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापूस विकायला सुरूवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत कापसाची आवक वाढली आहे. १९ डिसेंबरला ७ हजार क्विंटल कापूस व्यापारपेठेत आला असल्याने ही आवक विक्रमी मानली जात आहे. मागील कित्येक वर्षात वरोरा परिसरातील कापसाच्या व्यापारपेठेवर आलेली मरगळ आता दूर होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस गाठीला मागणी नसल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)