शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांत कापसाची आवक वाढली

By admin | Updated: November 7, 2016 01:24 IST

खरीप हंगामाच्या पूर्वी मशागतीपासून सातत्याने शेतात पैसे ओतणारा शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पीक हातात येत आहे.

दरामुळे शेतकरी चिंतेतच : जिल्ह्यात तीन ठिकाणी कापूस खरेदीचंद्रपूर : खरीप हंगामाच्या पूर्वी मशागतीपासून सातत्याने शेतात पैसे ओतणारा शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पीक हातात येत आहे. मात्र भाव पटण्याजोगा नाही. तरीही आर्थिक विवंचनेतून कापूस उत्पादन कापूस विकायला काढत आहे. याचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनीही कापूस खरेदीचा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात राजुरा, वरोरा, माढेळी या ठिकाणी बाजार समितींच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू असून समित्यात कापसाची आवक वाढू लागली आहे. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतकऱ्यांना चिंतेतच टाकून गेला. प्रारंभी पाऊस व्यवस्थित पडल्यानंतर पुढे पावसाने दडी मारली. अनेक दिवस पावसाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अधिकचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. त्यानंतर कसेबसे पीक वाचल्यानंतर वातावरणाच्या बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली. यातही शेतकऱ्यांनी पुन्हा पैसा खर्च करावा लागला. एवढे करूनही ऐन पीक हाती येत असताना परतीच्या पावसाने कहर केला. यात पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता जे पीक आहे, ते विकतो म्हटले तर पिकांना भाव नाही. कापसाबाबत अशीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र पैशाची गरज असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. वरोरा, माढेळी, राजुरा या ठिकाणी बाजार समित्यांच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वरोरा येथील रवी कमल कॉटेक्स व माढेळी येथील पारस कॉटनमध्ये ५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. कापूस खरेदीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विशाल बदखल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, संचालक किशोर भलमे, देवानंद मोरे, राजू आसुटकर, हरिदास जाधव, बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, सहा सचिव सचिन डहाळकर, लेखापाल किशोर महाजन, निरीक्षक कन्हैया वरुटकर आदी कर्मचारी उपस्थित होते. कापूस ठेवून येणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रविकमल काटेक्समध्ये प्रति क्विंटल ४७२५ रुपये तर पारस कॉटन माढेळी येथे प्रति क्विंटल ४७०७ रुपये दर देण्यात आला. रविकमल कॉटेक्समध्ये पहिल्या दिवशी ५९० क्विंटल तर पारस कॉटन येथे ८६० क्विंटल कापसाची आवक झाली. यासोबतच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार मुर्सा येथील केंद्रावरही कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आलेली आहे. कापसाला ४६५० ते ४७४१ रु. प्रति क्वि. भाव देण्यात आला. येथे आतापर्यंत २५ गाड्याची आवक झालेली आहे. बाजार समितीचे सभापती वासुदेव ह. ठाकरे यांनी पहिल्या बैलगाडीचे शेतकरी शंकर भाऊराव देहारकर रा. घोनाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच सदर कार्यक्रमाला उपस्थित बाजार समितीचे सदस्यांनी शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. विशेष म्हणजे, कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार होत असला तरी शेतकरी मात्र मिळणाऱ्या अल्प दरामुळे नाखूश असल्याचे दिसून येत आहे. कापसाचा दर पटण्याजोगा नाही; तरीही पैशाच्या गरजेपोटी नाईलाजाने त्यांना आपला कापूस विक्रीसाठी काढावा लागत आहे. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)सहा हजारांहून अधिक दर हवाशेतीच्या मशागतीपासून पीक हाती येईलपर्यंतचा लागवडी खर्च विचारात घेतला तर शेतकऱ्यांना कापसाला सहा हजारांहून अधिक दर हवा आहे. शासनाने अद्यापही शासकीय दर घोषित केलेला नाही. व्यापारी वाट्टेल तसा दर देऊन विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.दिवाळी अंधारातकापसाला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती येऊनही विक्रीसाठी काढले नाही. आज ना उद्या भाव वाढेल, याची प्रतीक्षा करीत असतानाच दिवाळी आली. कापूस विकला नाही म्हणून पैसेही आले नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.