शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

कपाशी व मिरचीचे उभे पीक करपले

By admin | Updated: October 16, 2015 01:36 IST

दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे.

गोवरी : दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे. मेहनतीने जोपासना केलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतातील पीक फळधारणेवर आले असताना धुव्वाधार पावसाने शेतातील कपाशीची व मिरचीची पिके भूईसपाट झाली.उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र पावसाने शेतातील पिकांची पूर्णत: वाट लावून टाकली आहे. पावसानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची पिके वाळली आहे तर मिरचीची पिके तुटून पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हरदोना (खुर्द) येथील अरविंद गोविंदा ढवळे यांचे चार एकरातील कपाशीचे उभे पिक वाळले आहे तर राजुरा तालुक्यातील गोवरी येथील गणपत जुनघरी, अरुण भलमे, भास्कर जुनघरी, अमित रणदिवे, नामदेव देवाळकर, बंडू जुनघरी, रामदास देवाळकर, विकास पिंपळकर, नथ्थू पिंपळकर, संतोष जुनघरी, प्रभाकर जुनघरी तर पेल्लोरा येथील साईनाथ जुनघरी यांच्या शेतातील मिरचीचे व कपाशीचे पिक वाळत चालले आहे.अतोनात खर्च करून हाती आलेले पिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हादरला आहे. डवरणी, निंदन व रासायानिक खते देऊन पिके वाढविली. मात्र अचानक आलेल्या संततधार पावसाने पिकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे आडवे झालेले पिक शेतकरी मजूर लावून उभे करीत आहे. एवढ्या मोठ्या शेतातील कपाशीचे पिक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. त्याकामी मजूर लावणेही शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. परंतु शेतातील उभे पिक पावसाने पूर्णत: आडवी झाल्याने शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय उरला नाही. पावसामुळे झाडाच्या मुळाजवळील माती वाहून गेल्याने झाडात उभे राहण्याची क्षमता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चावर पाणी फेरले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी पुरता हादरून गेला आहे. अतोनात खर्च करून पिक हाती येण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. (वार्ताहर)