शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेतून कोठारीला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:13 IST

बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यात केवळ ६० रमाई घरकूल : सरपंच, सदस्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

आॅनलाईन लोकमतकोठारी: बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. हा अन्याय दूर केला नाही तर आंदोलन करू, असा इशारा सरपंच मोरेश्वर लोहे व ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.सन २०१७-१८ या वर्षाकरिता कोठारी ग्रा. पं कडून रमाई घरकूल योजनेचे प्रस्ताव मागविले होते. ग्रा.पं. ने ठराव घेवून २५२ लाभार्थ्यांची यादी १ जानेवारी २०१८ ला पं.स.कडे पाठविण्यात आली. पंचायात समितीने प्राप्त यादीतील साठ घरकुलांना मंजुरी दिली. मंजूर गावांच्या यादीत कोठारीला वगळण्यात आले. अनुसूचित जातीतील एकाही लाभार्थ्यांला घरकूल यादीत स्थान मिळाले नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र नागरिक घरकूलसाठी प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर वंचित ठेवले, असा आरोप पात्र नागरिकांनी केला आहे.रमाई घरकुलचा लाभ घेण्यासाठी शासनाने निकष तयार केले आहेत. या निकषात कोठारी येथील अनुसूचित जातीचे नागरिक पात्र ठरतात. या सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. स्वबळावर घर बांधू शकत नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून घर मिळेल, याकडे त्यांचे लक्ष होते. यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व पुरावे सादर केले. ग्रामसभा घेवून ठरावही पारीत करण्यात आला. हा ठराव पंचायत समितीला सादर केल्यानंतर संबंधित अधिकाºयांनी बल्लारपूर तालुक्यासाठी केवळ ६० घरकूल मंजूर केले. चुकीच्या मानसिकतेमुळे कोठारी येथील पात्र नागरिकांवर अन्याय झाला आहे. या घटनेची चौकशी करून पात्र नागरिकांना घरकूल मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षताबल्लारपूर पं.स. अंतर्गत रमाई घरकूल योजनेच्या लाभापासून कोठारी येथील गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले. पंचायत समितीने निकषांचे पालन केले नाही. ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पंचायत समितीने त्रुटी कळविली असती तर दूर करता आली असती. पण, यासंदर्भात ग्रामपंचायतला काहीही कळविण्यात आले नाही. त्यामुळे अर्ज सादर करणाºया नागरिकांचा हिरमोड झाला आहे. या अन्यायाविरुद्धात पंचायत समितीसमोर पात्र नागरिकांसह बेमुद उपोषण करू, असा इशारा सरपंच मोरेश्वर लोहे व ग्रा. पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.