शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

कोतवाल पक्षी करतो मांजरीची मिमिक्री

By admin | Updated: August 7, 2014 23:52 IST

देशात कलावंतांची काही कमी नाही. आपण आजवर मिमीक्री करणारे अनेक आर्टीस्ट बघितले आहेत. मात्र चक्क पक्षीही मिमिक्री करू शकतो, हे ऐकून नवल वाटेल. मात्र हे खरे आहे. कोतवाल नामक

चंद्रपूर : देशात कलावंतांची काही कमी नाही. आपण आजवर मिमीक्री करणारे अनेक आर्टीस्ट बघितले आहेत. मात्र चक्क पक्षीही मिमिक्री करू शकतो, हे ऐकून नवल वाटेल. मात्र हे खरे आहे. कोतवाल नामक पक्षी मांजरीची मिमिक्री करतो, हे पक्षीमित्र्यांच्या अध्ययनावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय हा पक्षी पोपट, कावळा, मैनासारख्या इतर पक्ष्यांचाही हुबेहुब आवाज काढतो.अंधारी वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे अध्यक्ष व पक्षीमित्र प्रकाश कामडे यांनी कोतवाल या पक्ष्याच्या हालचालीचा बारकाईने अभ्यास केला. यावेळी हा पक्षी मांजर दिसताच मांजरीचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने मांजरासारखा आवाज काढतो. मांजर त्याच्या आवाजाला अनेकदा प्रतिसादसुध्दा देते. ती बाहेर आली की तिच्यावर झडप घालून तिला पळवूनही लावते. कोतवालाचा हा खेळ कामडे यांनी अनेकदा अनुभवला आहे. कोतवाल पक्ष्याला इंग्रजीत ब्लॅक ड्रोगो तर हिंदीत भुजंगा असे नाव आहे. अगदी छोट्या आकाराचा हा चपळ व किडकिडीत अंगाचा पक्षी काळ्या रंगाचा असतो. शेपटी खोलवर दुभागलेली असते. हा पक्षी विदर्भात सर्वत्र आढळतो. ग्रामीण भागात तर याचे वास्तव्य हमखास असते. भारताशिवाय हा पक्षी बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका व म्यानमार येथेही आढळतो. किडे, फुलांचे पराग, कधी कधी लहान पक्षी हे या कोतवलाचे खाद्य आहे. हा पक्ष्याचे ग्रामीण भागाशी खास नाते आहे. विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारावर हा पक्षी नेहमी ऐटीत बसलेला दिसतो. कुरणात जनावरे चरताना उडलेले किडे दिवसभर टिपतो. जंगलात आग लागल्यास तिथे कळपाने उपस्थित राहून किडे खातानाही हे पक्षी दिसतात.मिमिक्रीच्या माध्यमातून इतरांसोबत खेळणाऱ्या या पक्ष्याला कधी रागही येतो. रागाने कर्कश व आव्हान देणारा आवाज काढतो. कावळा, घार, शिका, कोकीळ व आपल्यापेक्षा मोठ्या पक्ष्यांना हाकलून लावण्यासाठी व आपल्या खाद्यापासून आणि घरट्यापासून दूर ठेवण्यासाठी तो आपल्यातील या कलाबाजीचा पुरेपूर वापर करताना दिसतो, अशी माहितीही पक्षीमित्र प्रकाश कामडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)