शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या बिलाकरिता चहापाण्याचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST

आवाळपूर : कोरपना पंचायत समिती अंतर्गत मागील पाच वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजने अंतर्गत ...

आवाळपूर : कोरपना पंचायत समिती अंतर्गत मागील पाच वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकूल बांधकाम करण्यात आले असून सद्यस्थितीत अनेक घरकुलांचे ब‍ांधकाम सुरु आहेत. पंचायत समितीचे अधिकारी घरकुलाचे बिल काढण्याच्या नावावर चहापाण्याचा खर्च म्हणून ५००० ते ८००० रुपये लाच घेत असल्याचे गैरप्रकार सर्रास सुरू असल्याचे बोलले जात असून या गैरप्रकाराला पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकाऱ्य‍ांनी आळा घालण्याची गरज आहे.

प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर असावे, याकरिता राज्य व केन्द्र सरकारने आवास योजनेला प्राथमिकता दिली आहे. अनेक कुटुबे पैसा नसल्याने घरबांधणी करू शकत नाही. त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध आवास योजनेतून अर्ज करणाऱ्या कुटुंबाला घर बांधणीकरिता निधी दिला जातो. शहरी भागाकरिता २ लाख ५० हजार रुपये व ग्रामीण भागाकरिता १ लाख ३० हजार रुपये याव्यतिरिक्त १८ हजार रुपये रोजगार हमी योजनेतून दिले जातात. कोरपना पंचायत समितीमध्ये घरकूल योजनेचे कामकाज हाताळण्याकरिता चार अधिकारी असून यातील तीन अधिकारी मानधन तत्वावर नियुक्त केले आहेत. दोन अभियंते व एक ऑपरेटर आहेत. घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज घेऊन तपासणे, डाटा ऑनलाईन करणे, घर बांधकामा संबंधाने लाभार्थ्यांकडे भेट देऊन तपासणी करणे, बिल टाकणे , शासन स्तरावर माहिती पाठविणे इत्यादी कामे अधिकारी बघतात. घरकुलाचे बिल काढण्यासाठी एका अधिकाऱ्यांकडून चहापाण्याचा खर्च सांगून पाच ते आठ हजार रुपये मागण्याचा प्रकार कोरपना तालुक्यात सर्रास सुरु आहे. या संदर्भाने काही घरकूल लाभार्थ्यांना विचारणा केली असता पैसे दिल्याची कबुली दिली आहे. कोरपना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन असला गैरप्रकार बंद करणे गरजेचे आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयातही तेथील लिपिकाला दोन- दोन हजार रुपये द्यावे लागतात. शासनाचा पगार घेऊनही अधिकारी वर्गाकडून गोरगरीब लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे.

कोट

घरकुलाचे कामकाज सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाकडून मानधन देण्यात येते. चहापाण्याचा खर्चाच्या नावाखाली लाभार्थ्यांना पैसे मागणे ही बाब योग्य नाही. घरकुलाचे बिल अधिकारी काढण्यास टाळाटाळ करुन विलंब लावत असल्यास लाभार्थ्यांनी आम्हाला माहिती द्यावी. यापुढे असला प्रकार होणार नाही, याकरिता पंचायत समिती स्तरावरुन उचित उपाययोजना करुन खबरदारी घेतली जाईल.

-रूपाली तोडासे

सभापती पंचायत समिती कोरपना.