शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या किमतीमुळे कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले

By admin | Updated: March 3, 2016 01:13 IST

टिळकनगर येथील कोट तलाव हा ब्रह्मपुरीचे हृदयस्थान आहे. या तलावाचे मोठ्या गाजावाजा करीत सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती.

काम थंडबस्त्यात : नागरिकांना सौंदर्यीकरणाची आतुरताब्रह्मपुरी : टिळकनगर येथील कोट तलाव हा ब्रह्मपुरीचे हृदयस्थान आहे. या तलावाचे मोठ्या गाजावाजा करीत सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. परंतु, वाढत्या किमतीमुळे या तलावाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने कोट तलावाची स्थिती पुन्हा जैसे थे होणार असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.ब्रह्मपुरी शहरात कोट तलाव, बारई तलाव व लेंडारी तलाव अशी मोठी जलसंपदा आहे. यापैकी मागील वर्षी कोट तलावाचे सौंदर्यीकरण करून नागरिकांना उत्साहाची पर्वनी देण्याचे स्वप्न दिले होते. कामे मोठ्या जोमाने दिवसंरात्र सुरू होती. पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. पण संबधीत विभागाकडून माहिती घेतली तर असे समोर आले की, जुन्या इस्टीमेटमध्ये तलावातील गाळ काढण्याविषयी एक मीटर खोलीचा समावेश होता. पण प्रत्यक्षात गाळ सहा मिटर खोलीपर्यंत काढणे आवश्यक असल्याने सुधारीत इस्टीमेटमध्ये सहा मिटर खोलीचा समावेश करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले. मात्र मंजुरीची प्रतिक्षा करावी लागत असून वाढत्या किंमतीचे ग्रहण तलावाच्या सौंदर्यीकरणाला लागल्याची बाब समोर आली.सध्या कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात असून दुसरीकडे नागरिकांना मात्र सौंदर्यीकरणाविषयी आतुरता लागली आहे. त्यामुळे या कामाला ताबडतोब मंजुरी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)