शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधी वाटपावरून नगरसेवकांमध्ये बिनसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:50 IST

मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मिळाला. मात्र मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तो आपल्याच प्रभागात देत इतर प्रभागाला डावलले. पदाधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठांची घेणार भेट : नगरोत्थानचा निधी पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मिळाला. मात्र मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तो आपल्याच प्रभागात देत इतर प्रभागाला डावलले. पदाधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यात विरोधकांसह सत्ताधारी भाजप नगरसेवकांचाही समावेश असून या नगरसेवकांनी गुरुवारी याबाबत जाब विचारण्यासाठी मनपात धडक दिली.शहरातील विविध प्रभागाच्या विकासासाठी शासनाकडून नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी दिला जातो. २०१७-१८ या वर्षासाठीदेखील शासनाकडून मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी वाटप करताना मनपाच्या सत्तारुढ पदाधिकाऱ्यांनी भेदभाव केल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक प्रभागातील वस्त्यांमधील अनेक कामे प्रलंबित आहे. तेथील नागरिकांच्या समस्या अजूनही कायम आहेत. मात्र २०१७-१८ मध्येही या वस्त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात आलेला नाही.मनपा पदाधिकाऱ्यांच्या या सापत्न वागणुकीमुळे विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्याही काही नगरसेवकांमध्ये सध्या तीव्र नाराजी पसरली आहे.नगरोत्थानचा निधी देताना आमच्या प्रभागाला का डावलण्यात आले, याबाबतचा जाब विचारण्यासाठी सोमवारी बसपा, शिवसेना, मनसे, राष्टÑवादी काँग्रेस व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी महापालिकेत धडक दिली. यात भाजपा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, शिवसेनेचे सुरेश पचारे, बसपाचे अनिल रामटेके, कश्यप, नगरसेविका मून, मनसेचे सचिन भोयर, दिलीप रामेडवार, विशाल निंबाळकर, अजय सरकार आदींचा समावेश होता.सर्व नाराज नगरसेवक मनपात गेले; मात्र महापौर अंजली घोटेकर या उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा उपमहापौर अनिल फुलझेले यांच्या कक्षाकडे वळविला. उपमहापौरांसमोर सर्वांनी आपली नाराजी व्यक्त करीत निधी वाटपात भेदभाव करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले.फुलझेले आणि कासनगोट्टूवार यांच्यात जुंपलीनगरोत्थानचा निधी वाटप करताना भाजपाचेच नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रभागात निधी दिला नाही. त्यामुळे विकासकामांसाठी प्रभागाला निधी द्यावा, या मागणीचे निवेदन द्यायला उपमहापौर अनिल फुलझेले यांच्या कक्षात गेले. यादरम्यान कासनगोट्टूवार आणि फुलझेले यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद एवढा वाढला की प्रकरण हातापायीवर येऊ लागले. त्यामुळे नगरसेवक सचिन भोयर यांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे वाद तेथेच निवळला.नगरसेवकांच्या कक्षात बैठकउपमहापौर यांना निवेदन दिल्यानंतर मनपामधील नगरसेवकांच्या कक्षामध्ये सर्व नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत पुढे काय करायचे, याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मनपा पदाधिकाऱ्यांकडून विकास निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याने याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांना भेट निवेदन दिले जाणार आहे.