शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अमृत योजनेवरून नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:31 IST

शहरात सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम करून जनजीवन विस्कळीत करून ठेवणाऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावर गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. स्वपक्षीय महापौर अंजली घोटेकर, सभापती राहुल पावडे यांची उलटतपासणी घेताना दीड वर्षापासून कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम आहात, असा प्रश्न केला.

ठळक मुद्देमनपाची आमसभा वादळी : पाईपलाईनकरिता विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदल्याने नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम करून जनजीवन विस्कळीत करून ठेवणाऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावर गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. स्वपक्षीय महापौर अंजली घोटेकर, सभापती राहुल पावडे यांची उलटतपासणी घेताना दीड वर्षापासून कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम आहात, असा प्रश्न केला. कंत्राटदाराच्या कामात सुधारणा झाली नाही तर काळया यादीत टाकण्याची मागणी केली. अमृत योजनेवरून सभागृहात भाजप नगरसेवक विरुद्ध पदाधिकारी असेच चित्र बघायला मिळाले.महापालिकेची सभा सुरू होताच सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अमृत पाणीपुरवठ्याच्या विषयावर सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विषय सुचीवरील विषयांवर चर्चा झाल्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी शेवटी अमृतचा विषय चर्चेला घेतला. यावेळी अमृतचे कंत्राटदार संतोष कन्स्ट्रक्शन कंपनी (नांदेड) चे संचालक संतोष मुरकुटे यांनाच आमसभेत हजर केले. कंत्राटदार बोलण्यास सुरुवात करताच भाजप नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, शिवसेनाचे सुरेश पचारे, मनसेचे भोयर यांनी दीड वर्षांपासून शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करत असल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन कंत्राटदाराचे स्वागत केले. सर्वच भाजप तथा काँग्रेस नगरसेवकांनी शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या सिमेंट व डांबरी रस्त्यासोबत नळजोडणी, फोन वायर, अपघात व खड्डे याबद्दल कंत्राटदारावर प्रश्नांचा भडीमार करत सुनावले. काम होत नसेल तर काळ्या यादीत टाका व दंड आकारा, अशीही मागणी भाजप नगरसेवकांनी केली.यावेळी कंत्राटदार मुरकुटे यांनी नगरसेवकांना सहकार्य करण्याची विनंती करतानाच जीएसटीमुळे सात कोटी तर पाईप आणि विविध साहित्याची किंमत वाढल्याने १५ कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे, असे सांगितले. अशाही स्थितीत शहरातील पाण्याच्या आठ टाक्या, पाईप लाईन व आरसीसी काम वेगात सुरू आहे. यवतमाळ व अमरावती येथील काम बंद पडले असून केवळ चंद्रपुरातच वेळेत काम सुरू आहे. थोडा त्रास सहन करा, पण सहकार्य करण्याची विनंती केली.भाजप नगरसेवक कंत्राटदाराला आगपाखड करत असताना महापौर व सभापती मध्येच प्रश्न उपस्थित करत होते. यावेळी भाजप नगरसेवकांनी दोन्ही पदाधिकाºयांना कंत्राटदार दीड वर्षापासून ऐकत नव्हता तेव्हा कुठे होता, आता कंत्राटदाराला आम्हालाच सुनावू द्या, असे म्हणून पदाधिकाºयांनाच सुनावले. नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, अमजद यांनी भाजप व कंत्राटदाराची मिली भगत असल्याचा आरोप केला. त्यामुळेच कंत्राटदारावर आजपर्यंत दंड आकारण्यात आला नाही अशी ओरड केली. नगरसेवक आसवानी व दीपक जयस्वाल यांनी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेण्याची मागणी लावून धरली. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम झाल्यानंतर बाहेर निघालेली माती व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे नागरिकांचे या सभेकडे लक्ष लागले होते.आठवडाभरात नळ जोडणीचे आश्वासनमनपाच्या मासिक सभेत अमृत पाणी पुरवठा योजनेचाच विषय सर्वाधिक गाजला. कंत्राटदारासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे अधिकारी वाघ यांनीही कंत्राटदार सहकार्य करत नसल्याचे सांगतानाच १५ दिवसांत शहरातील नळ जोडणी व इतर कामे सुव्यवस्थित करण्याचे आश्वासन मनपा सभागृहात दिले.