शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना दिवाणी, फौजदारी न्यायालयाची प्रतीक्षा संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:38 IST

कोरपना तालुका निर्माण होऊन २५ वर्षे लोटले. या ठिकाणी लोकन्याय दानाकरिता दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे म्हणून भव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

ठळक मुद्दे२७ पदांना मंजुरी मिळणार : संजय धोटे यांच्या मागणीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुका निर्माण होऊन २५ वर्षे लोटले. या ठिकाणी लोकन्याय दानाकरिता दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे म्हणून भव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम पूर्ण होऊनही इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपणार आहे.आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २७ पदांच्या भरतीला लवकरच मंजूरी मिळणार आहे. कोरपना हा तेलंगणा सीमेवर टोकावर असलेला तालुका असून न्यायासाठी राजुरा येथे ५० ते ६० किमी प्रवास करून जावे लागत होते. यात वेळ व पैसा वाया जात होता. या करिता आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन कोरपना येथील न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७ पदांंना वित्त विभागाकङून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली. ना. मुनगंटीवार यांनी या पदांची मान्यता तातडीने देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहे, असे जनसत्यागह संघटनेचे आबीद अली, रमेश मालेकर, प्रदिप पिपळशेंडे, किशोर बांधणे, विनोद जुमडे, नगरसेवक सुहेल अली, प्रल्हाद पवार, ताजणे, सोयाम आदींनी म्हटले आहे.