शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच होण्याचे अनेकांचे स्वप्न कोरोनामुळे भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

येत्या जुलै महिन्यात जिल्ह्यात ५० च्यावर ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कधी नव्हे, इतकी स्पर्धा आता बघायला मिळत आहे. पूर्वी निधी खर्चाचे अधिकार फारसे नव्हते.

ठळक मुद्देकोरोना मदतीतून वाढविला जनसंपर्क : वर्षभरापासून सुरू आहे तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये शासनाने ग्रामपंचायतींना निधी खर्चाचे अतिरिक्त अधिकार दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये चुरस बघायला मिळत आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै, आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींवर निर्बंध आल्याने मागील वर्षभरापासून सरपंच होण्याची तयारी करणाऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.येत्या जुलै महिन्यात जिल्ह्यात ५० च्यावर ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कधी नव्हे, इतकी स्पर्धा आता बघायला मिळत आहे. पूर्वी निधी खर्चाचे अधिकार फारसे नव्हते. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक न होता बिनविरोध सदस्यांना निवडून दिल्या जात होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये हे चित्र पूर्णत: बदलले आहे. शासनाच्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना थेट निधी मिळत आहे. जनतेतून सरपंच व त्या सरपंचाला मिळालेले वाढीव अधिकार यामुळे गावपातळीवर स्पर्धा निर्माण झाली.दरम्यान, राज्य शासनाने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे गावपातळीवरील पुढारी पुन्हा कामाला लागले आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीची मुदत येत्या जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. मात्र कोरोनामुळे निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग आहेत.गावागावात विकासकामांच्या चर्चाकोरोनाची दहशत असतानाही मुदत संपुष्टात येत असलेल्या बहुतांश गावामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. मात्र शासनाच्या आदेशामुळे अनेकाचे स्वप्न भंगले आहे.यावर्षी गावागावांत मास्क, सॅनिटायझर, शक्य तितकी मदत, जीवनावश्यकवस्तू वाटप करून आपली उमेदवारी निश्चित करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. एवढेच नाही, तर घरोघरी संपर्कही वाढविला आहे.मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या सरपंच तसेच सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने सरपंच तसेच सदस्यांना मुदत वाढवून देण्याचीही मागणी अनेकांनी केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदनही देण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंच