शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीला येणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनीही वाटा उचलला. याकरिता प्रकल्प संचालक राम चांदे व सचिन गांगारेड्डीवार यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रोजेक्टची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सचिन गांगरेड्डीवार यांच्याकडे केली होती.

ठळक मुद्देस्वॅब तपासणी कक्षाचे लोकार्पण : रोटरी क्लबच्या प्रयत्नामुळे स्वॅब सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रोटरी क्लब चंद्रपूरतर्फे शुक्रवारी कोरोना स्वॅब तपासणी कक्षाचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. या कक्षामुळे तपासणीला वेग येणार आहे.कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनीही वाटा उचलला. याकरिता प्रकल्प संचालक राम चांदे व सचिन गांगारेड्डीवार यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रोजेक्टची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सचिन गांगरेड्डीवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर लगेच तीन दिवसांच्या आत सदर युनिट उपलब्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सर्वांचे कौतुक केले. युनिटचे स्ट्रक्चर अतिशय सुंदर व बघण्यासारखे आहे. हे युनिट वर्धा येथून तयार करण्यात आले. युनिट आणण्यासाठी वाहन व चालकाची जबाबदारी रोडमल गहलोत यांनी स्वीकारली होती. रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, अशी माहिती अध्यक्ष स्मिता ठाकरे व सचिव संदीप रामटेके यांनी दिली.नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षणभद्रावती : शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी पूर्वनियोजन व खबरदारी म्हणून शनिवारी गौतम नगर परिसरात प्रशासनाकडून मॉकड्रिल करण्यात आला. शहरात सकाळपासूनच दुपारी २ वाजेपर्यंत हा परिसर सील ठेवला होता. नागरिकांचे सर्वेक्षण करून आरोग्याची माहिती जाणून घेण्यात आली. तहसील विभाग, पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका विभाग, आशावर्कर व ईको-प्रो संस्था आदी या परिसरात तळ ठोकून होते. खोकला, सर्दी, शिंका, ताप, त्रास घेण्यास त्रास आदी लक्षणांची माहिती घेण्यात आली.उपासमारीच्या भीतीने पायी प्रवासतळोधी बा. : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील मजूर काम करण्यासाठी राजुरा तालुक्यातील विरुर रेल्वे येथे गेले होते. मात्र,लॉकडावूनमुळे उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी पायदळ गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे व बससेवा बंद असल्याने हे मजूर राजुरा तालुक्यातून तीन दिवसरात्र प्रवास करून गावाकडे पायदळ निघाले आहेत. हातात पाण्याची बॉटल घेऊन रेल्वे लाईन मार्गाने हे मजूर स्वगावी जात आहे.पिंपळगावात हॉटेल सुरूचपिंपळगाव (भो): ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) हॉटेल सुरूच असल्याने ग्राहकांची गर्दी असते. शाळेत क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, समितीच्या उदासिनतेमुळे बाहेरूनआलेल्या व्यक्तींचे क्वारंटाईन केले जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक