शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयातील कोरोना लसीकरण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

(दि.२) तातडीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे सोमवारपासून लसीकरणाची शक्यता आहे. ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील नागरिकांचे कोरोना ...

(दि.२) तातडीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे सोमवारपासून लसीकरणाची शक्यता आहे.

४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी को-वीन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप किंवा संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. ही अ‍ॅप प्रत्येक प्ले स्टोअरवर असून त्याची लिंक डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. केंद्र शासनाने खासगी केंद्रात लसीच्या एक डोजकरिता २५० रूपये शुल्क ठरविल्याने काही ज्येष्ठांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. मात्र, ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद कोविड हॉस्पिटल, चंद्रपुरातील मुसळे चिल्ड्रन व क्राइस्ट हॉस्पिटल या तीन केंद्रांनी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याने लसीकरण होऊ शकले. शहरातील संजीवनी हॉस्पिटल, बुक्कावार हार्ट अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी रविवार (दि.७ मार्च )पर्यंत वेळ मागवून घेतली. त्यामुळे सोमवारपासून सर्व सातही खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

तांत्रिक अडचणींचा घोळ कायम

लसीकरणासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ॲपवर नोंदणी झाली नाही तर संबंधित पुरावे सादर करून थेट केंद्रात लसीकरण करता येते. मात्र, ज्यांना ॲपवर नोंदणीशिवाय पर्याय नाही, अशा व्यक्तींसाठी त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, मंगळवारी शासकीय केंद्रात किती ज्येष्ठांचे लसीकरण झाले, याची माहिती रात्री उशिरापर्यंत जिल्हा आरोग्य प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही.

खासगी डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण

कोरोना लसीकरणासाठी मान्यता दिलेल्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आज जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रशिक्षण दिले. लसीकरण होणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पाच प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, व्हॅक्सिन स्टोअर व व्हॅक्सिन करिअर तसेच अन्य सुविधा अत्यावश्यक आहेत. शिवाय, अन्य आरोग्य सुविधांचाही उपलब्धता पूर्ण करण्याच्या सूचना प्रशिक्षणात देण्यात आल्या.