शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची होणार आठवड्यातून दोनदा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST

शुक्रवार (दि. १२) पासून शहरात कोरोना चाचणीची सहा केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ ...

शुक्रवार (दि. १२) पासून शहरात कोरोना चाचणीची सहा केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ५३५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत ९ हजार ६७५ रुग्णांची नोंद झाली असून, २३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण बाधित मृतकांपैकी १९० मृतकांची नोंद चंद्रपुरात झाली. दरदिवशी रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक यापासून धडा घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्याचे पाऊल महानगरपालिका आरोग्य विभागाने उचलले. शुक्रवारपासून मोहिमेला सुरुवातही करण्यात आली. या मोहिमेमुळे कोरोनाबाधित व्यक्ती डिटेक्ट होऊन रुग्णांची संख्या कमी होईल, असा दावा मनपाने केला आहे.

कोण आहेत कोरोना सुपर स्प्रेडर?

चंद्रपुरातील ऑटोचालक, भाजी विक्रेता, हातठेला चालक, किराणा दुकानदार, कापड व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स चालक, तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तू विकणारे व या दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी, सतत नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच दुकानदारांची कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून मनपाने नोंद घेतली. या सर्वांनी दर १५ दिवसांतून कोरोना चाचणी करून घ्यावी, असा तगादा लावण्यात येणार आहे.

असे आहेत कोरोना चाचणी केंद्रे

वन अकादमी इमारत क्र. १ मूल मार्ग चंद्रपूर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरानगर मूल मार्ग, अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वाॅर्ड, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५ नेताजी चौक बाबूपेठ, सरदार पटेल प्राथमिक शाळा पंचतेली हनुमान वाॅर्ड रामनगर, जुनी लालपेठ कॉलरी हनुमान मंदिराजवळ बागला चौक, चंद्रपूर.

चाचणीनंतर मिळणार प्रमाणपत्र

शहरातील व्यावसायिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत कोरोना चाचणी केली जाईल. चाचणी झाल्यानंतर संबंधितांना मनपाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.