शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ ची आठवड्यातून दोनदा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

शुक्रवारपासून शहरात कोरोना चाचणीचे सहा केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ५३५ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र अंतर्गत ९ हजार ६७५ रूग्णांची नोंद झाली असून २३९ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण बाधित मृतकांपैकी १९० मृतकांची नोंद चंद्रपुरात झाली.

ठळक मुद्देचंद्रपुरात धक्कादायक रूग्णवाढ : मनपा आरोग्य विभागाचे कठोर पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक मोहिमेसोबतच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मास्क लावणे, अंतर पाळणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे ही साधी त्रिसुत्री पाळण्यासही नागरिक बेजबाबदारपणा दाखवत आहेत. चंद्रपुरात कोरोना रूग्णांची दररोज धक्कादायी वाढत होत असल्याने महानगर पालिका प्रशासनाने कोरोना कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्याचे कठोर पाऊल उचलले. शुक्रवारपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली.व्यापारी संघटनांची बैठकमनपाने शहरातील व्यापारी संघटनांची तातडीची बैठक घेतली. यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, शितल पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, चेंबर आफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, विनोद बजाज, सदानंद खत्री, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोढा, रेस्टॉरेन्टचे अशोक हासानी, राजू सलूजा, अविनाश रेभनकर, सुधाकर धकाते, किराणा व्यापारी संघटनेचे सुनिल हासानी, बळीराम शिंदे, संजय पावडे व अन्य उपस्थित होते.

चंद्रपूर शहरात कोरोना चाचणीचे सहा केंद्रशुक्रवारपासून शहरात कोरोना चाचणीचे सहा केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ५३५ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र अंतर्गत ९ हजार ६७५ रूग्णांची नोंद झाली असून २३९ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण बाधित मृतकांपैकी १९० मृतकांची नोंद चंद्रपुरात झाली. दरदिवशी रूग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक यापासून धडा घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्याचे पाऊल महानगर पालिका आरोग्य विभागाने उचलले. मोहिमेला सुरूवातही करण्यात आली. 

कोण आहेत चंद्रपुरातील कोरोना सुपर स्प्रेडर ?चंद्रपुरातील ऑटोचालक, भाजी विक्रेता, हातठेला चालक, किराणा दुकानदार, कापड व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स चालक तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तु विकणारे व या दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी, सतत नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच दुकानदारांची कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून मनपाने नोंद घेतली. या सर्वांनी दर १५ दिवसांतून कोरोना चाचणी करून घेण्याच्या मनपाने सूचना दिल्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या