शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बुरूड व्यावसायिक अडचणीत; आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:59 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यास बांबूपासून साहित्य तयार करणारा व्यवसायही अपवाद राहिला नाही. मागील दोन महिन्यांमध्ये बांबूच्या काळीपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरूड व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देतयार साहित्याची विक्री होत नसल्याने चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यास बांबूपासून साहित्य तयार करणारा व्यवसायही अपवाद राहिला नाही. मागील दोन महिन्यांमध्ये बांबूच्या काळीपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरूड व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.बुरुड व्यवसायिकांकडे साहित्य तयार असून विक्री होऊ शकत नाही. वाहतूक बंद असल्यामुळे बांबू आणू शकत नाही. डोक्यावर कर्ज, कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा, या विवंचनेत असलेले बुरूड व्यावसायिक पूर्णत: हतबल झाले आहेत. शासनाने लक्ष पुरवावे व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे.कोरोना महामारीचे संकट सर्व जगभर आहे. मागील दोन महिन्यांत अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांबूपासून टोपल्या, सुपे आदी वस्तू तयार करणारा बुरूड समाजही संकटात सापडला आहे. आजही मूळ व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे. बरेच समाजातील लोक हाच पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. या समाजातील अनेक लोक बांबू विक्रीचा देखील व्यवसाय करत असतात. गेल्या काही अनेक वर्षापासून बुरूड व्यवसाय टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कोरोनामुळे सध्या सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे आता हा व्यवसाय टिकविण्याचे आव्हान या समाजासमोर आहे. गांधी चौकात अनेक बुरुड समाजाचे नागरिक टोपले, सुप आदी साहित्य विक्री करण्यासाठी बसतात. लॉकडाऊनपूर्वी वस्तूची काही प्रमाणात खरेदी होत होती. मात्र आता आता ग्राहकांने खरेदीकडे पाठ फिरवली असल्याने आर्थिक अडचण येत असल्याने शासनाने मदत करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस