शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीरोग प्रतिबंधक शोधमोहिमेला कोरोना ठरतोय अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST

हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे दरवर्षी मार्च महिन्यात हत्तीरोग प्रतिबंध शोधमोहीम राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत गरोदर ...

हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे दरवर्षी मार्च महिन्यात हत्तीरोग प्रतिबंध शोधमोहीम राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व गंभीर आजारी असलेल्यांना वगळून दोन वर्षांपासूनच्या सर्वांना गोळ्यांचे वितरण करण्यात येते. यासोबतच वैयक्तिक व परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे लहान मुलांच्या पोटात कृमी होतात. परिणामी रक्तक्षय, बालकांना कमजोरी येणे, बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटणे असा परिणाम होऊ शकतात. याला टाळण्यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम १ मार्चपासून सुरू करण्यात येणार होती. आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन गोळ्यांचे वितरण करणार होते. यासंदर्भात आरोग्य विभागाने नियोजन केले होते.

परंतु, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने घरोघरी जाऊन गोळ्यांचे वितरण करताना आरोग्य विभागाला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत या मोहिमेला सध्या स्थगित करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर ही योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बॉक्स

मोहीम लांबणीवर

जिल्ह्यात हत्तीरोग प्रतिबंधक मोहिमेंतर्गत गोळ्यांचे वितरण करण्यात येणार होते. शासनाच्या सूचनेप्रमाणे आरोग्य विभागाने नियोजन केले होते. परंतु, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन मोहीम राबविल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ही बाब हेरून आरोग्य विभागाने सध्या ही मोहीम लांबणीवर टाकली असून, रुग्णसंख्या घटल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे.

बॉक्स

हत्तीरोग प्रतिबंधक मोहीम राबविण्याकरिता आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका एमपीडब्लू यांचे पथक तयार करून वयोगटानुसार गोळ्यांचे वितरण करण्यात येणार होते. यासंदर्भात नियोजनही करण्यात आले होते. तशा सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या होत्या. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही मोहीम तूर्तास समोर ढकलण्यात आली आहे.

कोट

हत्तीरोग प्रतिबंधक मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वयोगटानुसार गोळ्यांचे वाटप करीत असतो. परंतु, सद्य:स्थितीत ही मोहीम थांबविण्यात आली आहे. वरिष्ठांचे निर्देश येताच ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

- प्रकाश साठे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर