शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

कोरोना रुग्ण दहा हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ९९, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील १२, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील सहा, वरोरा तालुक्यातील २२, भद्रावती तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील २१, गडचिरोली येथील तीन असे एकूण १९७ बाधित पुढे आले आहे.

ठळक मुद्देनवे बाधित १९७ : एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी दहा हजारांचा आकडा पार केला आहे. मंगळवारच्या नव्या १९७ बाधितांना पकडून एकूण रुग्णसंख्या दहा हजार ९ वर पोहचली आहे. यातील पाच हजार ८७६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर तीन हजार ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मागील २४ तासात केवळ एकाच कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.मंगळवारी मृत्यू झालेला रुग्ण तुकूम चंद्रपूर येथील ४५ वर्षीय पुरुष असून त्याला कोरोनासह श्वसनाचा आजारा होता.जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ९९, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील १२, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील सहा, वरोरा तालुक्यातील २२, भद्रावती तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील २१, गडचिरोली येथील तीन असे एकूण १९७ बाधित पुढे आले आहे.चंद्रपूर शहर व परिसरातील बाबूपेठ, बालाजी वार्ड, महेश नगर, चोर खिडकी परिसर, समता चौक परिसर, दुर्गापूर, जगन्नाथबाबा नगर, शास्त्रीनगर, नगिनाबाग, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी परिसर, दाताळा, जटपुरा वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, विश्वकर्मा नगर, महाकाली वार्ड, कोतवाली वार्ड, बापट नगर, आकाशवाणी रोड परिसर, ओमनगर भिवापूर वॉर्ड या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. जिल्ह्यात चाचण्या वाढविल्या आहेत.गर्दी टाळण्याची गरजचंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. त्यामुळे आताही गर्दी टाळण्याचीच नितांत गरज आहे.कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे.बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या