शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना वाढला, सॅनिटायझर वापर मात्र घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे ...

कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळल्याबरोबर नागरिकांकडून सावधगिरी बाळगण्यात आली. सॅनिटायझरचा खप इतका वाढला की, दुकानात मिळेनासे झाले. अनेकांनी तर चढ्या दराने सॅनिटायझरची विक्री केली. परंतु, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज ८० च्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या २५ हजारच्या जवळपास पोहोचली असून ८६१ बाधित ॲक्टिव्ह आहेत. तरीसुद्धा नागरिक बेफिकीरीने वागत असून सॅनिटायझरचा वापर कमी प्रमाणात करीत आहेत. मात्र, त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे.

कोट

घरी राहिले तर दिवसातून तीन ते चारदा साबणाने हात स्वच्छ करीत असते. घराबाहेर पडताना सॅनिटायझर पर्समध्ये घेऊन जाते व त्याचा वापर करीत असते. मास्क किंवा रुमाल बांधूनच घराबाहेर पडते.

- प्रतिमा कोडापे, चंद्रपूर

-----------

सॅनिटायझर किंवा साबण दोन्ही एकाच प्रकरचे काम करीत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात साबणाने हात धूत असतो. मास्कचा वापरसुद्धा करीत असतो. कोरोना टाळण्यासाठी सर्वसामान्यांनासुद्धा लस देणे गरजेचे आहे.

-अमोल गेडाम, चंद्रपूर.

बॉक्स

४० टक्के विक्री घटली

भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून येताच सॅनिटायझरची विक्री वाढली. चंद्रपुरात मे महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. तेव्हा जिल्ह्यात सॅनिटायझरचा तुटवडा पडला. ऑक्टोबर, नोव्हेबरपासून रुग्णसंख्या घटली. तसेच सॅनिटायझरची विक्री घटली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु, सॅनिटायझरची विक्री जैसे थे आहे. बहुतांश ग्राहक छोटी सॅनिटायझरची बॉटल किंवा स्प्रेची मागणी करतात. परंतु, मध्यम किंवा मोठ्या प्रमाणातील सॅनिटायझरला पाहिजे त्या प्रमाणात मागणी दिसून येत नाही. पूर्वीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी सॅनिटायझरची विक्री घटली आहे.

कोट

सॅनिटायझर हे पर्यायी साधन आहे. त्यामुळे पाणी किंवा साबण उपलब्ध नसल्यास सॅनिटायझरचा वापर करतात. मार्च-एप्रिल २०२० मध्ये सॅनिटायझरची मागणी प्रचंड होती. अनेक ठिकाणी तुटवडा भासला. मात्र, रुग्णसंख्या कमी होताच विक्रीमध्ये घट झाली. परंतु, आता पुन्हा हळूहळू सॅनिटायझर विक्री वाढत आहे. सॅनिटायझरच्या छोट्या बॉटल्सची विक्री पूर्वीप्रमाणेच होत आहे.

रंजित दांडेकर,

संघटन सचिव,

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, चंद्रपूर

बॉक्स

मागील वर्षीची विक्री ८५

यंदाची सॅनिटायझर विक्री ५०

मास्क विक्रीत घट २०