शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

कोरोनाने आतापर्यंत रोखला 401 जणांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

शासनाच्या आदेशानुसार आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करूनच कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने या नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: रस्त्यावर भिक मागून खाणारे अनेक घटकांतील नागरिकही वंचित राहू शकतात. जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांची बेफीकीरी कायमच: जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण संख्या पोहचली ७७३ वर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात ४०१ रुग्णांचा श्वास कोरोनाने रोखला आहे. सध्यास्थितीत ७७३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे, सध्यास्थितीत बरे होणाऱ्यांपेक्षा कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दुप्पटच्या वर गेले आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाची दहशत कायम आहे. मागील २४ तासामध्ये ९६ रुग्णांची भर पडली असून कोरोनावर मात केल्याने २२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफीकीरी न करता कोरोनाला मनावर घेणे आता अत्यावश्यक आहे.मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होती. मात्र मध्यंतरी यामध्ये झपाट्याने वाढ झाली. एवढेच नाही तर मत्यूसंख्याही वाढली. दिवाळीनंतर हा आकडा कमी झाला. आता पुन्हा कोरोनाने तोंडवर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.गुरुवारी बाधित आलेल्या ९६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २९, चंद्रपूर तालुका ११, बल्लारपूर एक, भद्रावती चार, ब्रम्हपुरी १८, नागभीड दोन, मूल एक, सावली एक राजूरा पाच, वरोरा २३ व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ४८१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ३०७ झाली आहे. सध्या ७७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख २७ हजार ३०२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ७७६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

लसीकरणापासून अनेकजण राहणार वंचित

शासनाच्या आदेशानुसार आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करूनच कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने या नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: रस्त्यावर भिक मागून खाणारे अनेक घटकांतील नागरिकही वंचित राहू शकतात. जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सुविधा कर्मचारी तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील सर्व नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहेत. या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी काही खासगी रुग्णालयांमध्ये आधारकार्ड घेऊन गेल्यानंतर तिथेही ऑनलाईन नोंदणी करून दिली जात आहे. मात्र आधार कार्ड अत्यावश्यक आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या