शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन होळीच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

जिल्ह्याने लाॅकडाऊन केला असून नागरिकांवर कठोर निर्बंध लादले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णवाढीचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे किमान आतातरी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. मध्यतरी रुग्णसंख्या अगदी कमी झाली होती. त्यामुळे कोरोना संकट गेले की काय, अशी अवस्था होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनवे पॉझिटिव्ह ३४१ : सलग दुसऱ्या दिवशीही तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होत असून रविवारी म्हणजे ऐन होळीच्या दिवशीच जिल्ह्यात कोरोनाचा भडका उडाला. तब्बल ३४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्याने लाॅकडाऊन केला असून नागरिकांवर कठोर निर्बंध लादले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णवाढीचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे किमान आतातरी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. मध्यतरी रुग्णसंख्या अगदी कमी झाली होती. त्यामुळे कोरोना संकट गेले की काय, अशी अवस्था होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने किमान निर्बंध लावण्याची मागणी केली जात आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २७ हजार २६५ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ८१० झाली आहे. 

चंद्रपूरची स्थिती चिंताजनकचंद्रपूर मनपा हद्द व चंद्रपूर तालुक्यात दररोज आढळून येणारी रुग्णांची संख्या मोठी आहे. रविवारीदेखील चंद्रपूर मनपा हद्दीत ११३ तर तालुक्यात ३४ रुग्ण आढळले. त्यामुळे चंद्रपूरची स्थिती आता चिंताजनक होत चालली आहे. 

ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पोहचली २०३२ वरमागील २४ तासात १६५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात २ हजार ३२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. 

वरोरापाठोपाठ राजुराही हॉटस्पॉटच्या दिशेनेआतापर्यंत वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होेते. आता राजुरा तालुक्यातही स्थिती चिंताजनक होत आहे. रविवारी वरोरा तालुक्यात ५० तर राजुरा तालुक्यात ३४ रुग्ण आढळले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या