शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे.

ठळक मुद्देजिल्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर : तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक म्हणजेच, २१५ रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांचा जीवसुद्धा गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन तर होणार नाही, ना अशी भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शेजारील यवतमाळ, वर्धा तसेच नागपूरमध्ये कोरोना रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाही लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी वेळीच सतर्क होणे आता तरी गरजेचे झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे. रविवारी मृत झालेल्यामध्ये बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष व ढुमने लेआऊट, गडचांदूर, येथील ७३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.आतापर्यंत दोन लाख ५० हजार ९१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख १९ हजार ८२४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१० बाधितांचे मृत्यू झाले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या