कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत अनेक निर्बंध लागू केले. जिल्हा प्रशासनाकडून या निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनामुळे न्यायालयात होणारी गर्दी लक्षात घेऊन, उच्च न्यायालयानेही जिल्हा न्यायालयांच्या कामकाजासाठी नवीन नियमावली लागू केली. जिल्हा न्यायालयात शक्य असेल, तरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे. या कालावधीत वकील, पक्षकार, साक्षीदार, तसेच आरोपी यांच्या गैरहजेरीत न्यायालय कोणताही आदेश देणार नाही.
खटल्यातील पक्षकार व वकिलांना प्रवेश
न्यायालयाच्या दैनंदिन बोर्डावर उल्लेख केलेल्या मोजक्याच खटल्यांचे कामकाज त्या दिवशी चालविण्यात येणार आहे. संबंधित खटल्यातील पक्षकार व वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येईल. उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत ही नवीन नियमावली कायम राहणार आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नवीन नियमावली लागू केली. या नियमावलीनुसार आरोग्याची संपूर्ण खबरदारी घेऊनच जिल्हा न्यायालयात दोन तासांची दोन सत्रे सुरू आहेत. खटल्याशी संबंधित सर्वांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाने पालन करावे.
- अॅड.शरद आंबटकर, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर