शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसंवादातून गावकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देग्राम सामजिक परिवर्तन अभियान : गावातील समस्यांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गम भागातील गावांना वेगळी कलाटणी देऊन आदर्श गाव करण्याकडे वाटचाल सुरुआहे. या उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी विविध विभागातील अधिकारी ग्रामीण भागात भेट देऊन ग्रामसंवादाच्या माध्यमातून गावकºयांशी संवाद साधत असून त्यांचा समस्या जाणून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याने समस्या सुटण्यात मदत होत आहे.या गावात साधला निवासी संवादमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकारी यांचा अध्यादेशाने सर्व तालुका स्तरांवरील अधिकारी अभियानातील गावामध्ये निवासी राहुन ग्रामसवांद हा कार्यक्रम घेत आहेत. गावातील नागरिकांचा समस्या जाणून घेऊन त्यां समस्याचे निरासरण करीत आहेत. तसेच आपल्या विभागातील योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत जिवती तालुक्यातील माराई पाटण, पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ, नागभीड तालुक्यातील पेंडरी बरड, चंद्रपूर तालुक्यातील मोहुर्ली, चिमूर तालुक्यातील कवडशी देश, कोरपना तालुक्यातील जेवरा, मूल तालुक्यातील कोसंबी अशा १७ गावांमध्ये नुकतीच अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामवासीयांशी सवांद साधला आहे.सात तालुक्यात सुरु आहे अभियानजिल्ह्यातील जिवती, कोरपणा, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर, चिमूर, नागभीड या सात तालुक्यातील तब्बल ४२ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्य सुरू असून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून जनजागृती करुन लोकांच्या मानसिकतेत बदल करून त्यांची विचारधारा विकासात्मक दृष्टीने घडविण्याचे कार्य करीत आहे. तसेच स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी, महिला बचत गट, सक्षमीकरण, स्वयंरोजगार, शिक्षण, युवकांना मार्गदर्शन, सरकारी योजनांविषयी मार्गदर्शन, जलसंधारण आदी बाबींवर विशेष लक्ष देत आहेत.