शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा निवाऱ्यासाठी संघर्ष

By admin | Updated: January 24, 2017 00:43 IST

पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द येथे मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास असलेल्या ...

शासनाकडून थट्टा : केव्हा मिळणार घरकुलाचा लाभ?पोंभुर्णा : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द येथे मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास असलेल्या अल्पभूधारक विधवा महिला सुमनबाई गद्देकार हिचे संपूर्ण घर कोसळले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या सुमनबार्इंना शेजाऱ्यांनी आश्रय दिला. शासनाने मात्र तिला तुटपुंजी मदत देऊन तिची अवहेलना केली.मागील दोन वर्षापूर्वी संततधार पावसाने सुमनबार्इंचे अख्ये घर भुईसपाट झाले. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा घराशेजारील पुरुषोत्तम घुग्घुस्कार नामक व्यक्तीने आपल्या घरी तिला आश्रय दिला. त्यांची हलाखीची स्थिती बघून येथील सामाजिक कार्यकर्ते निलकंठ नैताम व जि.प. सदस्या संगीता घोंगडे यांनी तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी चापडे व तहसीलदार राजेश सरवदे यांची भेट घेऊन या आपादग्रस्त महिलेची कैफीयत मांडली आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून चौकशी केली व १५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. इतरांच्या घरी किती दिवस आश्रय घ्यावा लागेल, याचे शल्य सुमनबाईला बोचत होते. परंतु स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने व गावकऱ्यांच्या सहकार्यातून छोटीशी का होईना झोपडी बांधून तिची निवाऱ्याची व्यवस्था करुन देण्यात आली. सदर महिला ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती असून आज ती ६५ वर्ष वयाची आहे. सुमनबार्इंचे पती सिताराम हे दहा वर्षापूर्वीच वारले. त्यामुळे त्या एकट्याच आहे. त्यांना अपत्य नाही. झोपडीत शौचालयाची सोय नाही. केवळ निराधार योजनेच्या ६०० रुपयांवर ती कशीबशी हलाखीचे जीवन जगत आहे. निराधार व गरीब नागरिकांना स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाने घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला मजबूत घर मिळेल, हा जरी शासनाचा उद्देश असला तरी मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सुमनबाईसारखे अनेक वृद्ध आजही हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. ६५ वर्ष ओलांडलेल्या सुमनबार्इंना त्यांच्या म्हातारपणात तरी घरकुल योजना मिळणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)सदर महिलेने पोंभुर्णा येथील तत्कालीन तहसीलदार सरवदे यांची भेट घेतली असता घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आज या ठिकाणी नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सदर विधवा महिलेला घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.